शरद पवार यांची सोळावी शपथ....

बारामती विधानसभा मतदारसंघातून १९६७मध्ये शरद पवार सर्वात प्रथम आमदार म्हणून निवडून गेले होते, तेव्हापासून राजकीय जीवनात कोणत्याच निवडणुकीत त्यांचा पराभव झालेला नाही. देशाच्या सर्व सभागृहात त्यांनी काम केलेले आहे
Sharad Pawar Taking Oath for Sixteenth Times
Sharad Pawar Taking Oath for Sixteenth Times

बारामती :  भारतीय राजकीय इतिहासात प्रदीर्घ काळ राजकारण केलेल्या काही मोजक्या व्यक्तिमत्वांमध्ये एक असलेल्या शरद पवार यांचा एक नवीन विक्रम झाला आहे. संसद व विधीमंडळ सदस्य म्हणून त्यांनी आतापर्यंत १६ वेळा शपथ घेतली आहे.  काल त्यांनी राज्यसभा सदस्यत्वाची घेतलेली तब्बल सोळावी शपथ होती. 

खासदार सुप्रिया सुळे यांनीच या बाबत त्यांच्या फेसबुकवर ही माहिती दिली आहे. बारामती विधानसभा मतदारसंघातून १९६७ मध्ये शरद पवार सर्वात प्रथम आमदार म्हणून निवडून गेले होते, तेव्हापासून राजकीय जीवनात कोणत्याच निवडणुकीत त्यांचा पराभव झालेला नाही. देशाच्या सर्व सभागृहात त्यांनी काम केलेले आहे. राज्याच्या विधानसभा व विधानपरिषदेसह लोकसभा व राज्यसभेतही शरद पवार गेल्या अनेक वर्षांपासून कार्यरत आहेत. गेल्या काही वर्षांपासून निवडणुकीपासून दूर राहत त्यांनी राज्यसभेवर निवडून जाण्याचा मार्ग स्विकारला आहे. 

आमदार, मंत्री, मुख्यमंत्री, केंद्रीय संरक्षण व कृषी मंत्री, केंद्रात विरोधी पक्ष नेते यासह दोन डझनहून अधिक महत्वाच्या संस्था व संघटनांचे प्रमुखपद त्यांनी भूषविले आहे. देशातील एक ज्येष्ठ राजकीय व्यक्तिमत्व म्हणून त्यांचा परिचय आहे. राज्य व राष्ट्रीय राजकारणात ५० वर्षांहून अधिक काळ यशस्वीपणे कार्यरत असलेले नेते म्हणून त्यांचा परिचय आहे. 

नुकत्याच झालेल्या महाराष्ट्राच्या विधानसभेच्या निवडणूकीनंतर महाविकासआघाडीची मोट बांधण्याचे काम शरद पवार यांनीच केले होते व भाजपला १०५ जागा मिळूनही सत्तेपासून दूर ठेवण्याचे काम शरद पवार यांनी केले. शरद पवार दुस-यांदा राज्यसभेवर जात आहेत.

शरद पवार यांची झळाळती कारकिर्द....

•सहा वेळा विधानसभेत आमदारकीची शपथ

•एक वेळा विधानपरिषदेत शपथ

•सात वेळा लोकसभा सदस्यत्वाची शपथ

•दोन वेळा राज्यसभा सदस्यत्वाची शपथ
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com