एकनाथ खडसेंची ती बहुचर्चित 'सीडी' कुठेय?

माझ्या मागे ईडी लावलीत तर मी तुमची सीडी लावेन असा भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांना इशारा देणाऱ्या राष्ट्रवादी नेते एकनाथ खडसे यांची ती 'सीडी' आता गेली कुठे, असा सवाल सोशल मिडियावर (Social Media) विचारला जात आहे
Ekanath Khadse
Ekanath Khadse

पुणे : माझ्या मागे ईडी लावलीत तर मी तुमची सीडी लावेन असा भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांना इशारा देणाऱ्या राष्ट्रवादी नेते एकनाथ खडसे यांची ती 'सीडी' आता गेली कुठे, असा सवाल सोशल मिडियावर (Social Media) विचारला जात आहे. राष्ट्रवादी काँग्रेस समोरच्या अडचणी वाढल्याच्या काळात तरी खडसे आपली 'सीडी'बाहेर काढतील अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. NCP Workers Asking Ekhanath Khadse about CD

मधल्या काळात खडसें (Ekanath Khadse) ईडीने (ED) चौकशीसाठी बोलविले होते. ईडीच्या विरोधात ते न्यायालयात गेले. कठोर कारवाईपासून त्यांना संरक्षण मिळवावे लागले. ईडीने चौकशीला बोलविल्यानंतर खडसेंना कोरोनाची (Corona) लागण झाली. त्यामुळे सध्या याबाबतची चौकशी संथगतीने सुरू आहे. मात्र, ईडीची चौकशीची नोटीस येऊनही खडसेंची 'सीडी'बाहेर आली नाही. त्यामुळे सोशल मिडियावर याबाबत प्रश्न विचारले जात आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) पक्ष संपल्यावर ही 'सीडी' बाहेर पडणार का, असे मिस्किल सवाल सोशल मिडियावरुन विचारले जात आहेत. 

२३ आॅक्टोबर, २०२० रोजी एकनाथ खडसे यांनी भाजपला रामराम करुन राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. या वेळी त्यांनी भाजपच्या (BJP) नेतृत्वावर जोरदार हल्लाबोल केला होता. आयुष्यातील ४० वर्षे ज्या पक्षासाठी घातली त्यानेच मला अडगळीत टाकले, अशी खंत त्यांनी बोलून दाखविली. माझ्या मागे 'ईडी' लावाल तर तुमच्या मागे 'सीडी' लावेल, असा इशाराही त्यांनी दिला होता. 'मी एकनाथ गणपत खडसे, माझ्या व्यक्तीगत कारणासाठी भाजपच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा देत आहे,' एवढे दोन ओळींचे पत्र लिहून खडसेंनी पक्षाला रामराम ठोकला होता.

पक्ष सोडताना त्यांनी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांवर (Devendra Fadanavis) गंभीर आरोप केले आहेत. भाजपच्या सरकारमध्ये माझ्या राजीनाम्याची मागणी कुणीही केली नव्हती. माझ्या चौकशीचीही मागणी कुणी केली नव्हती. पण तरीही राजीनामा द्यायला लावला. माझी तक्रार देवेंद्र फडणवीसांबाबत आहे. माझ्यावर त्यांनी विनयभंगाचा खटला दाखल करायला लावला. हे मरणाहून मेल्यासारखे आहे. माझ्यासोबत अत्यंत खालच्या स्तराचं राजकारण फडणवीसांनी केले. माझा परिवाराला यामुळे मनस्ताप झाला. माझ्यावर पाळत ठेवली गेली. मंत्री असताना नऊ महिने पाळत ठेवली. मला काही मिळाले किंवा नाही मिळालं याचेदुख नाही, असे खडसे म्हणाले होते. NCP Workers Asking Ekhanath Khadse about CD

आता राज्यात परमबीर सिंग यांनी राष्ट्रवादीचे नेते व गृहमंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांच्यावर शंभर कोटींच्या वसुलीचा गंभीर आरोप केला आहे. त्यावरून विरोधकांनी राष्ट्रवादी काँग्रेसला लक्ष्य बनवले आहे. त्या आधी सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे (Dhananjay Munde) बलात्काराच्या आरोपाखाली अडचणीत आले होते. या दोन्ही वेळे खडसेंची 'ती' सीडी राष्ट्रवादी काँग्रेसला उपयोगी पडेल, अशी अपेक्षा कार्यकर्त्यांना होती. आतातरी खडसे आपली ती 'सीडी' बाहेर काढतील का, असे सवाल नेटकरी विचारत आहेत.
Edited By - Amit Golwalkar

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com