राज ठाकरेंनी अर्पण केली जेम्स बाँडला आदरांजली

लेखक इयान फ्लेमिंग यांच्या कादंबरीतून जेम्स ब्रिटिश सिक्रेट सर्व्हिस एजंट ००७ जेम्स बाँडचा जन्म झाला. 'डो नो' या बाँडपटातून शाॅन काॅनरी यांनी बाँड पटात आगमन केले. त्यांनी पुढच्या आयुष्यात अनेक भूमीका केल्या. मात्र, लक्षात राहिला तो त्यांनी साकारलेला जेम्स बाँडच. या महान कलाकाराचे निधन काल झाले. बाँडपट आवडणारे चाहते त्यामुळे हळहळले. त्यातच समावेश आहे तो राज ठाकरे यांचा.
Sean Connery - James Bond - Raj Thackeray
Sean Connery - James Bond - Raj Thackeray

पुणे : गॉडफादर म्हणलं की मार्लन ब्रँडो ह्यांचाच चेहरा जसा डोळ्यासमोर येतो तसं जेम्स बॉण्ड म्हणलं की बॉन्डपटांच्या चाहत्यांना शॉन कॉनरीच आठवतात. आजही माझे सगळ्यात आवडते बॉण्ड नट हे शॉन कॉनरीच आहेत. शॉन कॉनरी ह्यांच्या स्मृतीस माझी विनम्र श्रद्धांजली, असे लिहित मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी 'जेम्स बाँड' शाॅन काॅनरी यांना आदरांजली अर्पण केली आहे

लेखक इयान फ्लेमिंग यांच्या कादंबरीतून जेम्स ब्रिटिश सिक्रेट सर्व्हिस एजंट ००७ जेम्स बाँडचा जन्म झाला. 'डो नो' या बाँडपटातून शाॅन काॅनरी यांनी बाँड पटात आगमन केले. त्यांनी पुढच्या आयुष्यात अनेक भूमीका केल्या. मात्र, लक्षात राहिला तो त्यांनी साकारलेला जेम्स बाँडच. या महान कलाकाराचे निधन काल झाले. बाँडपट आवडणारे चाहते त्यामुळे हळहळले. त्यातच समावेश आहे तो राज ठाकरे यांचा.

आपल्या फेसबूक पेजवरुन राज यांनी शाॅन काॅनरी यांना आदरांजली अर्पण केली आहे. आपल्या फेसबूक पोस्टमध्ये राज म्हणतात....

शीतयुद्धाच्या काळात इयान फ्लेमिंग ह्यांच्या पुस्तकातील 'जेम्स बॉण्ड' हा लोकप्रिय होणं हे स्वाभाविक होतं पण त्या नायकाचं पुस्तकातलं अस्तित्व प्रतिमेच्या विश्वात शॉन कॉनरी ह्यांनी अधिक उत्कट केलं, ठळक केलं.   शॉन कॉनरी ह्यांनी ६ बॉन्डपट केले पण त्या बॉण्डपटातील जेम्स बॉण्ड त्यांनी इतका घट्ट रुजवला की त्यामुळे पुढे जेम्स बॉण्ड साकारणाऱ्या प्रत्येक नटाची दमछाक झाली. 

कधीही सूर्य न मावळण्याची वलग्ना करणाऱ्या ब्रिटिश साम्रज्याचा सूर्य दुसऱ्या महायुद्धानंतर मावळतीला लागला आणि अशा वेळेस जागतिक राजकारणात ब्रिटनचं महत्व उत्तरोत्तर कमी होत असताना किमान प्रतिमा पातळीवर ब्रिटन ही महासत्ता आहे हा भास कायम ठेवण्यात 'इयान फ्लेमिंग' ह्यांच्या प्रतिभेतून उतरलेला आणि 'शॉन कॉनरी' ह्यांच्या प्रतिमेतून उभा राहिलेला 'जेम्स बॉण्ड' कारणीभूत आहे.  प्रतिभा आणि प्रतिमेच्या संगमाच्या जोरावर एखादया देशाची सॉफ्ट पॉवर निर्माण होणं आणि ती अनेक दशकं टिकणं हे जगातील दुर्मिळ उदाहरण असावं. 

शॉन कॉनरीना पडद्यावर पाहताना प्रेक्षकाला स्वतःच्यातल्या मर्यादा, उणिवा जाणवत राहतात पण तरीही मी पण मर्त्य माणूस आहे, सगळे लोभ, मोह हे मला पण सुटले नाहीत हे दाखवत त्यांनी 'जेम्स बॉन्ड'ला वास्तवाच्या जगात घट्ट रोवून उभं केलं, हे शॉन कॉनरी ह्यांचं यश. आणि म्हणूनच आजही माझे सगळ्यात आवडते बॉण्ड नट हे शॉन कॉनरीच आहेत. शॉन कॉनरी ह्यांच्या स्मृतीस माझी विनम्र श्रद्धांजली. 

Edited By - Amit Golwalkar

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com