पदाधिकाऱ्यांना पोट कमी करण्याचा अजित पवारांनी दिला सल्ला!

लांनो करिअर निवडताना विचार करा, आपल्या आई-वडिलांना विचारा. पण राजकारणाच्या भानगडीत पडू नका, असा सल्ला उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज विद्यार्थ्यांना दिला. पुणे जिल्हा परिषद येथे राज्य गुणवत्ता यादीत आलेल्या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र वितरण कार्यक्रमाप्रसंगी ते बोलत होते
Ajit Pawar's advice to Leaders about growing tummy
Ajit Pawar's advice to Leaders about growing tummy

पुणे : मुलांनो करिअर निवडताना विचार करा, आपल्या आई-वडिलांना विचारा. पण राजकारणाच्या भानगडीत पडू नका, असा सल्ला उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज विद्यार्थ्यांना दिला. पुणे जिल्हा परिषद येथे राज्य गुणवत्ता यादीत आलेल्या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र वितरण कार्यक्रमाप्रसंगी ते बोलत होते. मी राजकारणात आलोय. त्यात अडकलोय, कुठे जाता येईना आणि बाहेरही पडता येईना, अशी अवस्था असल्याचेही त्यांनी गंमतीने सांगितले.

अजित पवार म्हणाले,'' कोरोनाच्या महामारीमुळे विद्यार्थ्यांच मोठं नुकसान झाले आहे. त्यामुळे नवे माध्यम स्वीकारले पाहिजे. ऑनलाइन शिक्षण सुरू आहे, पण कोरोना अजून गेलेला नाही त्यामुळे काळजी घेतली पाहिजे. मला खूप लोकं भेटतात, आमची कोरोनामुळे नोकरी गेल्याचं सांगतात. त्यामुळे मुलांनी करिअर निवडताना विचार करावा. आम्हाला जनता म्हणाली घरी बसा की आम्ही चाललो घरी. पण सीईओंचे पहा. रिटायर होत नाहीत, तोपर्यंत खुर्चीवरच. शिवाय प्रमोशनही होत जाते.'' 

अजित पवार यांनी आज मास्क काढून भाषण केले. त्याचाही उल्लेख त्यांनी आपल्या भाषणात केला. "माझे उच्चार व्यवस्थित व्हावेत, यासाठी मी मास्क काढला. नाहीतर तुम्ही म्हणाल या बाबानेच मास्क घातला नाही आणि आम्हाला शिकवतोय,'' असे ते म्हणताच सभागृहात हशा पसरला.  अभिनेता, कला, संगीत पत्रकार असं वेगवेगळ्या क्षेत्र विद्यार्थी निवडू शकतात. असे क्षेत्र निवडा ज्यातून आनंद आणि पैसे मिळतील. नाहीतर घरात गेला की भांडी आदळली नाही पाहिजेत, आला मेला असं नाही झालं पाहिजे,'' असेही पवार म्हणाले.

"कोणत्याही क्षेत्रात जा पण आई वडिलांचे नाव रोशन करा. चारित्र्याला डाग लागणार नाही याचा विचार करा. विश्वासार्हता संपली की माणूस संपतो. मित्र निवडतांना चांगले मित्र निवडा. कारण काही वेळा मित्रच बरबाद करायला पुढे असतात.  बायको आल्यावर आई वडिलांना विसरून जातात. असे करू नका, आई वडिलांचा विचार करा'' असेही पवार यांनी सांगितले. 

पवार यांनी आपल्या भाषणात व्यायामाचे महत्त्व सांगितले. पदाधिकाऱ्यांना पोट कमी करण्याचाही सल्ला त्यांनी दिला. ते म्हणाले, ''मी पाचला उठलो आणि तासभर व्यायाम केला. सातलाच एक उदघाटन केले. मला लोक विचारातात की झोपला होता की नाही. काही पुढाऱ्यांचे पोट पुढे आले आहे. काय सांगावं काही कळत नाही. मुलांनो व्यायाम करा. आता तुम्ही म्हणाल  तुमच्या मागे बसलेल्याना सांगा स्टेजवर ही काही लोकांची पोटं सुटायला लागली आहेत,'' असा चिमटाही त्यांनी काढला.
Edited By - Amit Golwalkar
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com