राजू शेट्टींना कार्यकर्त्यांनी दिली भाताची रोपे - Farmers Presented Paddies to Raju Shetty | Politics Marathi News - Sarkarnama

राजू शेट्टींना कार्यकर्त्यांनी दिली भाताची रोपे

संपत मोरे
शुक्रवार, 31 जुलै 2020

स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे वाळवा तालुका अध्यक्ष भागवत जाधव व तांबवेचे कार्यकर्ते  संतोष शेळके हे भाताची उत्तम शेती करत आहेत. कालच त्यांनी भात शेतीचे उत्तम फोटो फेसबुक वर पोस्ट केले होते. ते फोटो राजू शेट्टी यांनी पाहिले त्यांनी दोघांचेही कौतुक केले.

पुणे : स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी फेसबुक'वर भागवत जाधव यांच्या शेतातील इंद्रायणी भाताची रोपे पाहिली.त्या रोपांचे कौतुक करत  त्यांनी भागवत जाधव यांच्याकडे मलाही भात लागणीसाठी अशी रोपे हवी आहेत.असे सांगताच भागवत जाधव आणि महेश खराडे हे रोपे घेऊन राजू शेट्टी यांच्या शेतात गेले. आणि त्यांना भातलागणीला मदतही केली.

राजू शेट्टी हे जेव्हा दौऱ्यावर जातात तेव्हा अनेक शेतकरी त्यांना शेतातील माल देतात. ज्वारी, बाजरी, मका,भात अशा वस्तू शेट्टी यांना दिल्या जातात. काल शेट्टी यांच्यासाठी कार्यकर्ते भाताची रोपे घेऊन गेले होते. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे वाळवा तालुका अध्यक्ष भागवत जाधव व तांबवेचे कार्यकर्ते  संतोष शेळके हे भाताची उत्तम शेती करत आहेत. कालच त्यांनी भात शेतीचे उत्तम फोटो फेसबुक वर पोस्ट केले होते. ते फोटो राजू शेट्टी यांनी पाहिले त्यांनी दोघांचेही कौतुक केले. तसेच ''मलाही भात लागण करायची आहे. चांगले बियाणे असेल तर उपलब्ध करून द्या." अशी विनंती केली. 

भागवत जाधव यांनी इंद्रायणी जातीचे उत्तम बियाणे उपलब्ध केले. आज महेश खराडे, भागवत जाधव, संतोष शेळके, संजय बेले, प्रकाश देसाई, रविकिरण माने,देवेंद्र धस आदी कार्यकर्ते त्यांच्या शेतात गेले. राजू शेट्टी शेतातच  होते. त्यांच्या सोबत त्यांचे सुपूत्र सौरभ होते. उत्तम रोपे आणल्याबद्दल त्यांनी कार्यकर्त्यांचे कौतुक केले. शेतात कामासाठी असलेल्या कामगारासोबत या कार्यकर्त्यांनी शेट्टी यांना भात लागणीसाठी मदत केली. राजू शेट्टी आमदार होते तेव्हापासून ते जेव्हा दौऱ्यावर जातात तेव्हा अनेक शेतकरी त्यांना प्रेमाने शेतातील माल देतात. ज्वारी, बाजरी, मका, भात, भाजीपाला अशा वस्तू शेट्टी यांना दिल्या जातात. 
Edited By - Amit Golwalkar

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख