इंदापुरातील 38 ग्रामपंचायती भाजपच्या ताब्यात : हर्षवर्धन पाटलांचा दावा 

या निवडणुकीत सत्ताधाऱ्यांच्या ताब्यातील अनेक ग्रामपंचायती भाजपने ताब्यात घेतल्या आहेत.
BJP's power over 38 gram panchayats in Indapur: Harshvardhan Patil's claim
BJP's power over 38 gram panchayats in Indapur: Harshvardhan Patil's claim

इंदापूर (जि. पुणे) : इंदापूर तालुक्‍यातील 38 ग्रामपंचायतींवर भारतीय जनता पक्षाची निर्विवाद, तर 4 ग्रामपंचायतींवर संमिश्र सत्ता आली आहे. भिगवण, वालचंदनगर या मोठ्या ग्रामपंचायतींवर भाजपने एकतर्फी सत्ता मिळवली आहे. या निवडणूक निकालातून इंदापूर तालुक्‍यावरील भाजपचे वर्चस्व निर्विवादपणे सिद्ध झाले आहे, असा दावा भाजपचे नेते तथा माजी सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील यांनी केला आहे. 

पाटील म्हणाले, ग्रामपंचायत निवडणुका पक्षीय चिन्हावर लढवल्या गेल्या नसल्या तरी इंदापूर तालुक्‍यातील जनता भाजपच्या पाठीमागे असल्याचे मतदारांनी दाखवून दिले आहे. इंदापूरच्या सत्ताधाऱ्यांच्या विरोधात जनतेने मतपेटीतून दिलेला हा स्पष्ट कौल आहे. 

नीरा नरसिंहपूर, गोंदी, ओझरे, पिठेवाडी, भोडणी, भांडगाव, कचरवाडी (बा), टणू, सरडेवाडी, बाभूळगाव, गलांडवाडी नं.1, गलांडवाडी नं.2, वरकुटे खुर्द, रेडा, जाधववाडी, सराफवाडी, पिटकेश्वर, निमसाखर, भिगवण, तक्रारवाडी, पोंधवडी, शेटफळगढे, अकोले, निरगुडे, निंबोडी, पिंपळे, व्याहळी, गोतोंडी, दगडवाडी, निरवांगी, तावशी, भादलवाडी, वालचंदनगर, कळंब, सपकळवाडी, लोणी देवकर, बळपुडी, भावडी, चांडगाव या 38 ग्रामपंचायती भाजपकडे आल्या आहेत. 

या गावांचा सर्वांगीण विकास करण्यासाठी कटिबद्ध आहे. या निवडणुकीत सत्ताधाऱ्यांच्या ताब्यातील अनेक ग्रामपंचायती भाजपने ताब्यात घेतल्या आहेत. भाजपच्या ताब्यात तालुक्‍यातील सुमारे 70 टक्के ग्रामपंचायती आल्या आहेत. 

इंदापूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती आप्पासाहेब जगदाळे, कर्मयोगी कारखान्याच्या उपाध्यक्ष पद्मा भोसले, नीरा-भीमा कारखान्याचे अध्यक्ष लालासाहेब पवार, नीरा-भीमा कारखान्याचे संचालक उदयसिंह पाटील, इंदापूर पंचायत समितीच्या सभापती स्वाती शेंडे आदींसह भाजप पदाधिकारी, गावोगावच्या कार्यकर्त्यांनी ग्रामपंचायत निवडणुकीत विजयासाठी सत्ता नसतानाही परिश्रम घेतले आहेत. आगामी काळातील सर्वच निवडणुका जिंकून भाजप आपली ताकद पुन्हा दाखवून देईल, असा विश्वासही पाटील यांनी व्यक्त केला. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com