काय उद्धवजी पण.....? विचारत नितेश राणेंनी उडवली संजय राऊतांची खिल्ली!

संजय राऊत यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची मॅरेथाॅन मुलाखत घेतली आहे. ही मुलाखत ११, १२ व १३ जुलैला प्रसारित केली जाणार आहे. त्या मुलाखतीचा 'प्रोमो' राऊत यांनी आपल्या ट्वीटर हँडलवरुन प्रसारित केला आहे. या प्रोमोवरुन नितेश राणेंनी राऊत यांची खिल्ली उडवली आहे
BJP Mla Nitesh Rane Teases Shivsena MP Sanjay Raut
BJP Mla Nitesh Rane Teases Shivsena MP Sanjay Raut

पुणे : संजय राऊत म्हणतात 'एक शरद! सगळे गारद!!......उद्धवजी पण गारद??? आपल्याच मालकाला??!! वाह! वाह! क्या बात!! असे म्हणत भाजपचे आमदार नितेश राणे यांनी 'सामना'चे कार्यकारी संपादक, शिवसेना नेते व खासदार संजय राऊत यांची 'ट्वीटर'वरुन खिल्ली उडवली आहे. 

संजय राऊत यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची मॅरेथाॅन मुलाखत घेतली आहे. ही मुलाखत ११, १२ व १३ जुलैला प्रसारित केली जाणार आहे. त्या मुलाखतीचा 'प्रोमो' राऊत यांनी आपल्या ट्वीटर हँडलवरुन प्रसारित केला आहे. 'एक शरद...सगळे गारद!!' असे म्हणत त्यांनी या मुलाखतीचे प्रमोशन केले आहे. राणे यांनी नेमके हे टिपत...उद्धवजी पण गारद??? असे विचारत संजय राऊतांना चिमटा काढला आहे.

राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची घेतलेली मुलाखत देशात खळबळ माजवणार असल्याचा दावा शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केला आहे. राऊत यांनी पवार यांची प्रदीर्घ मुलाखत घेतली. महाविकास आघाडी सरकारमध्ये तणाव असतानाच, त्यांनी घेतलेली पवारांची मुलाखत अतिशय महत्त्वाची आहे. खुद्द राऊत यांनी या मुलाखतीची माहिती ट्‌विटरद्वारे दिली. ही जोरदार राजकीय मुलाखत देशाच्या राजकारणात खळबळ माजवेल, असा दावा राऊत यांनी केला आहे.

दरम्यान, आपल्याच भावाचे ७ नगरसेवक फोडणाऱ्यांना या ५ जणांना परत घेताना तरी लाज वाटेल का? असा सवाल उपस्थित करुन भाजप आमदार नितेश राणे यांनी शिवसेनेवर जबरदस्त टीका केली आहे. पारनेरचे पाच नगरसेवक राष्ट्रवादीत गेल्यानंतर पुन्हा शिवसेनेत आले. या घटनेवरुन त्यांनी शिवसेनेला लक्ष्य केले आहे. २०१७च्या आॅक्टोबरमध्ये मुंबई महापालिकेतील महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नगरसेवक शिवसेनेने फोडले होते. त्याचा संदर्भ देत नितेश राणेंनी आजच्या घटनेवरुन शिवसेनेवर टीका केली. जे ऐका भावाला नाही जमलं ते अजित दादांनी शब्दासाठी "करून दाखवले" !! , असे म्हणत राणेंनी शिवसेनेची काल खिल्ली उडवली. 

पाच दिवसांपूर्वी शिवसेनेचे हे पाच नगरसेवक पक्षाचे माजी आमदार विजय औटी यांच्यावर नाराज होत ते राष्ट्रवादीत गेले. या प्रवेशाच्या वेळी अजित पवार हजर होते. त्यामुळे सत्ताधारी पक्षातील नेते एकमेकांचे कार्यकर्ते पळवत असल्याचे चित्र होते. पारनेर प्रकरण काही महत्त्वाचे नाही, असे शरद पवार आणि संजय राऊत सांगत होते. तरी शिवसेनेत त्याची तीव्र प्रतिक्रिया उमटली होती. मिलिंद नार्वेकर यांनी सोमवारी अजित पवार यांना फोन करून हे नगरसेवक परत देण्याची मागणी करत होते. पारनेरचा विषय राष्ट्रीय किंवा राज्याचा नाही, अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी पुण्यात दिली होती. 

Edited By : Amit Golwalkar

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com