जिवाभावाच्या कार्यकर्त्यासाठी अजित पवारांनी घेतली बॅट हातात.... - Ajit Pawar inaugurated Cricket Tournament in Baramati | Politics Marathi News - Sarkarnama

जिवाभावाच्या कार्यकर्त्यासाठी अजित पवारांनी घेतली बॅट हातात....

मिलिंद संगई
रविवार, 27 डिसेंबर 2020

अजित पवार राज्यात विक्रमी मताधिक्याने का विजयी होतात त्या यशामागच सर्वात महत्वाच कारण म्हणजे छोट्यातील छोट्या कार्यकर्त्याला ते जपतात, अडचणीला धावून जातात आणि आग्रह देखील मान्य करतात हेच आहे. 

बारामती : ....ज्या बारामतीकरांनी भऱभरुन मताधिक्याने विजयी केले, त्या बारामतीकरांबद्दल अजित पवार हे नेहमीच मृदू असतात, अनेकदा कार्यकर्त्ते आग्रह करतात, आणि ज्यांनी इतकी वर्षे जिवाभावाने काम केले त्यांचा शब्दही अजितदादांना मोडवत नाही.....

आजही असेच झाले. बारामतीत गेल्या अनेक वर्षांपासून अजित पवार यांच्यासाठी काम करणारा सतीश खुडे नावाचा एक साधा कार्यकर्ता. निवडणूकीत आघाडीवर असलेला व जिव तोडून प्रचार करणारा. दरवर्षी ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त बारामतीत क्रिकेटच्या स्पर्धा आयोजित करण्याची त्याची परंपरा...यंदाही त्याने असेच सामने भरवले आहेत. त्याने मुंबईच्या जनता दरबारात जात अजितदादांकडे विनंती केली की दोन मिनिटे का होईना तुम्ही मैदानावर येऊन भेट देऊन जा.....

आपल्या कार्यकर्त्याचा आग्रह मोडतील ते अजित पवार कसले. अत्यंत व्यस्त दिनक्रमातून वेळ काढून ते आवर्जून आले, या सामन्यांचे उदघाटन थेट बॅट हातात घेत बॅटींग करुन केले. सतीश खुडे याच्या आग्रहाखातर व्यासपीठावरही काही काळ गेले, सर्वांना शुभेच्छा देऊन मग ते काटेवाडी कडे मार्गस्थ झाले. 

अजित पवार राज्यात विक्रमी मताधिक्याने का विजयी होतात त्या यशामागच सर्वात महत्वाच कारण म्हणजे छोट्यातील छोट्या कार्यकर्त्याला ते जपतात, अडचणीला धावून जातात आणि आग्रह देखील मान्य करतात हेच आहे. 

सतीश खुडे हा बारामतीतील एक छोटासा कार्यकर्ता. १९८२ पासून अजितदादांच्या खांद्याला खांदा लावून प्रत्येक निवडणूकीत रात्रीचा दिवस करणारा. दादांनाही हाडाचे कार्यकर्ते अचूकपणे माहिती असल्याने आज त्यांनी आपल्या व्यस्त कार्यक्रमातून वेळ काढत आपणही कार्यकर्त्यांचा सन्मान करतो हेच दाखवून दिले. 

Edited By - Amit Golwalkar

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख