आप राम है, लेकिन विलासी राम है.. - Tributes to Late PM Atal Behari Vajpayee | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

सातारा : लॉकडाऊनच्या विरोधात साताऱ्याचे भाजपचे खासदार उदयनराजे भोसले यांनी आज पोवईनाका येथे पोत्यावर बसून भिक मांगो आंदोलन केले.

आप राम है, लेकिन विलासी राम है..

उत्तम कुटे
शुक्रवार, 25 डिसेंबर 2020

कुलकर्णी हे एक कारसेवक म्हणून ६ डिसेंबर १९९१ ला अयोध्येत होते. त्यावेळी उत्तरप्रदेशसह चार राज्यात भाजप सत्तेत होता. कल्याणसिंह उत्तरप्रदेशात मुख्यमंत्री होते. केंद्रात,मात्र कॉंग्रेसचे सरकार होते. नरसिंहराव पंतप्रधान होते.या भारत देशात रामाला मानणारा वर्ग होता, आहे व राहील,असे वाजपेयी बाबरी पडल्यावर बोलल्याची आठवण कुलकर्णींनी सांगितली

पिंपरी : २९ वर्षापूर्वी (१९९१) याच महिन्यात ६ तारखेला बाबरीचे पतन झालं होतं.ती कुणी पाडली हे सर्वश्रूत आहे. लालकृष्ण अडवाणींसह भाजपचे ज्येष्ठ नेते त्यावेळी अयोध्येत होते. पी.व्ही. नरसिंहराव पंतप्रधान,तर अटलबिहारी वाजपेयी विरोधी पक्षनेते होते.या घटनेनंतर झालेल्या संसदेच्या हिवाळी अधिवेशनात अभूतपूर्व गोंधळ झाला. नरसिंहराव सरकारवर अविश्वास प्रस्ताव आला. त्यावर वाजपेयी यांचे घणाघाती भाषण झाले. ते सरकारवर तुटून पडले. इस संहार को रोकनेमे सरकार कम पडी है,असा हल्लाबोल त्यांनी  केला. हे त्यांचे भाषण व तीन दिवसाच्या वादळी चर्चेचा साक्षीदार होतो, असे पिंपरी-चिंचवडमधील भाजपचे ज्येष्ठ कार्यकर्ते व सहा टर्म प्रदेश सदस्य राहिलेले महेश कुलकर्णी यांनी 'सरकारनामा'ला सांगितले. वाजपेयी यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या आठवणींना उजाळा देताना ते बोलत होते.

कुलकर्णी हे एक कारसेवक म्हणून ६ डिसेंबर १९९१ ला अयोध्येत होते. त्यावेळी उत्तरप्रदेशसह चार राज्यात भाजप सत्तेत होता. कल्याणसिंह उत्तरप्रदेशात मुख्यमंत्री होते. केंद्रात,मात्र कॉंग्रेसचे सरकार होते. नरसिंहराव पंतप्रधान होते.या भारत देशात रामाला मानणारा वर्ग होता, आहे व राहील,असे वाजपेयी बाबरी पडल्यावर बोलल्याची आठवण कुलकर्णींनी सांगितली. यह तो होना ही था. राम स्वाधीन है, पराधीन है, इसलिए राजनिती छोडो, असा सल्लाही त्यांनी त्यावेळी दिला होता.

बाबरी पतनानंतरच्या संसद अधिवेशनाचा थरारक अनुभव सांगताना कुलकर्णी म्हणाले, अयोध्येहून पुण्यात आल्यानंतर झेलम एक्सप्रेसने दिल्लीला गेलो. पुण्याचे त्यावेळी भाजपचे खासदार अण्णा जोशी होते.त्यांनी संसदेतील प्रेक्षक गॅलरीचा पास दिला होता.त्यामुळेच बाबरी पडल्यानंतर नरसिंहराव सरकारवर आलेल्या अविश्वास ठरावावर तीन दिवस चाललेल्या  वादळी चर्चेचा साक्षीदार होता आले. वाजपेयींचे घणाघाती वक्तृत्व पुन्हा एकदा प्रत्यक्ष पाहता आले. त्यांनी केंद्र सरकारलाच याप्रकरणी जबाबदार धरले. हा प्रकार केंद्र सरकारला थांबवता आला नाही, असे ते म्हणाले. 

 जनतेच्या मनातून राम कधी जाणार नाही, असे सांगताना राम कभी हट नही सकते, असे वाजपेयी आपल्या भाषणात त्यावेळी म्हणाले होते. तो संदर्भ घेऊन यावेळी  नरसिंहराव मंत्रीमंडळातील मंत्री रामविलास पासवान स्वताकडे अंगुलीनिर्देश करीत म्हणाले होते की....यहॉं राम है. यावर आप राम है,पर विलासी राम है! अशी कोपरखळी भाजपच्या हजरजबाबी ज्येष्ठ नेत्या (स्व.)  सुषमा स्वराज यांनी मारली होती,असे कुलकर्णी म्हणाले. अभूतपूर्व गोंधळ आणि नाताळची सुट्टी यामुळे हे हिवाळी अधिवेशन तहकूब होऊन ते पुन्हा जानेवारीमध्ये १९९२ ला सुरु झाले होते.
Edited By - Amit Golwalkar

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख