पद असो वा नसो, हा शिवाजी तुमच्यासोबत कायम उभा आहे

पद असो वा नसा हा शिवाजी तुमच्यासोबत कायम उभा आहे. भविष्यात कोणतीही कितीही गंभीर परिस्थिती निर्माण होवो, तुम्ही निर्धास्त रहा, असा विश्वास शिवसेना उपपनेते आणि शिरूरचे (जि.पुणे) माजी खासदार शिवाजीराव आढळराव -पाटील यांनी शिरुरवासियांना दिला.
पद असो वा नसो, हा शिवाजी तुमच्यासोबत कायम उभा आहे
Shivajirao Adhalrao Work Report Published by CM Uddhav Thackeray

पिंपरीः पद असो वा नसा हा शिवाजी तुमच्यासोबत कायम उभा आहे. भविष्यात कोणतीही कितीही गंभीर परिस्थिती निर्माण होवो, तुम्ही निर्धास्त रहा, असा विश्वास शिवसेना उपपनेते आणि शिरूरचे (जि.पुणे)माजी खासदार शिवाजीराव आढळराव -पाटील यांनी शिरुरवासियांना दिला. 

कोरोना महामारीतील त्यांच्या कामाच्या 'जनसेवक' या अहवालाचे प्रकाशन वर्षा या निवासस्थानी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते झाले. त्याच्या प्रास्ताविकात आढळरावांनी वरील विश्वास व्यक्त केला आहे. कोरोना काळातील मदतीचा कुणा लोकप्रतिनिधी वा राजकीय नेत्याचा प्रसिद्ध झालेला हा पहिलाच कार्यअहवाल आहे.
 
राजकीय पदावर असताना कामे करणारे अनेकजण असतात. पण, ते असो वा नसो शिवसैनिक म्हणून संकटात धावून जा, अशी शिवसेनाप्रमुखांची शिकवण असल्याने ती जपली. अडचणीत असलेल्याला मदतीचा हात दिला,असे आढळरावांनी जनसेवकच्या मनोगतात म्हटले आहे. आपण माझे कुटुंब असून तुमच्या सुखदुखात सहभागी होणे हे माझे मी कर्तव्य समजतो, असेही ते पुढे म्हणतात.

शिवसेना सचिव अनिल देसाई, विधानपरिषद उपसभापती डॉ.निलम गोऱ्हे, माजी केंद्रीय मंत्री खासदार अरविंद सावंत, शिवसेना उपनेते रवींद्र मिर्लेकर आदी यावेळी उपस्थित होते.कोरोनात राबविलेले अन्नछत्र, रक्तदान, धान्यदान आदी उपक्रम सॅनिटायझर्स, मास्क, पीपीई किट वाटप,निसर्ग चक्रीवादळ अन अतिवृष्टीचा जबर तडाखा बसलेल्या भागातील शेतकऱ्यांना प्रत्यक्ष भेटून मानसिक आधाराबरोबर दिलेली आर्थिक,जीवनावश्यक साहित्याची  मदत आदींची छायाचित्रासह माहिती या कार्य अहवालात देण्यात आली आहे.

आढळराव म्हणतात, गेल्या लोकसभा निवडणुकीत मला पराभव पत्करावा लागला.मात्र, पराभूत त्यानंतरही मी कधीच घरात थांबलो नाही. रस्त्यावर उतरुन लोकांच्या मदतीला धावून गेलो. पक्षासाठी, संघटनेसाठी आणि समाजासाठी कार्यरत राहिलो. कोरोनात ज्या लोकांचे रोजगार गेले, रोजचे उत्पन्न कमी झाले आणि व्यवसाय बंद पडले अशा सर्वांच्या घरची चूल पेटती राहील, याची काळजी आम्ही घेतली. अत्यावश्यक सेवा बजाविणाऱ्या सर्व कर्मचाऱ्यांना सोयीसुविधा मिळाव्यात  यासाठी सर्व पातळ्यांवर प्रयत्न केले. नागरिकांची अडचणीतुन सुटका करण्यासाठी राज्य सरकारशी, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी संपर्कात राहून त्यावर तोडगा काढण्याचा प्रयत्न केला. 
Edited By - Amit Golwalkar
 

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in