पंतप्रधान पुण्यात अन नोटिसा,मात्र पिंपरीमध्ये
Police Served Notices in PCMC Ahead of PM's Pune Tour

पंतप्रधान पुण्यात अन नोटिसा,मात्र पिंपरीमध्ये

पंतप्रधान नरेंद्र मोदी हे सिरम इन्स्टिट्यूटला भेट देण्यासाठी काल फक्त एक तासाच्या पुणे दौऱ्यावर आले होते. यावेळी आंदोलन होण्याची गोपीनीय खबर मिळाल्याने खबरदारीचा उपाय म्हणून पोलिसांनी पिंपरी चिंचवडमधील युवक काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांना नोटीस बजावली होती

पिंपरी : पंतप्रधान नरेंद्र मोदी हे सिरम इन्स्टिट्यूटला भेट देण्यासाठी काल फक्त एक तासाच्या पुणे दौऱ्यावर आले होते. यावेळी आंदोलन होण्याची गोपीनीय खबर मिळाल्याने खबरदारीचा उपाय म्हणून पोलिसांनी पिंपरी चिंचवडमधील युवक काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांना नोटीस बजावली होती.एवढेच नाही,तर सिरम संस्थेच्या  परिसरातील हौसिंग सोसायट्यांनाही अशा नोटीसा देऊन त्यांना दारे खिडक्याच नाही, तर खिडक्यांचे पडदेही व्हीव्हीआयपी म्हणजे पीएम जाईपर्यंत बंद ठेवण्यास सांगितले होते.

युवक काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस मयूर जयस्वाल यांना चिंचवड पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक सुधाकर काटे यांनी ही नोटीस आज सकाळीच बोलावून बजावली.पीएम दौऱ्यात आपण आंदोलन करणार असल्याची माहिती मिळाली असून ते करू नये, अन्यथा कडक कारवाई केली जाईल,असा इशारा या नोटीसीव्दारे देण्यात आला. कोरोनामुळे शहरात पोलिस आयुक्तांनी जमावबंदी लागू केली असल्याने पाचपेक्षा अधिक व्यक्ती जमण्यास अगोदरच निर्बंध आहेत, याकडेही पोलिसांनी लक्ष वेधले होते. भविष्यातील कारवाईसाठी ही नोटीस पुरावा म्हणून कोर्टात सादर केली जाईल,असा इशाराही त्यांनी दिला आहे. या नोटीसीवर जयस्वाल यांनी आश्चर्य व्यक्त केले. आम्ही कसलेच आंदोलन करणार नव्हतो वा तसा विचारही नव्हता,असे त्यांनी 'सरकारनामा'शी बोलताना सांगितले.

एवढेच नाही, तर पुण्यातील हडपसर पोलिसांनी सिरम संस्थेच्या परिसरातील अनेक हौसिंग सोसायट्यांनाही अशा नोटीसा या दौऱ्याच्या तीन दिवस आधीच बजावल्या होत्या. त्याअन्वये सोसायटीतील सर्व रहिवाशांच्या नावांची यादी देण्यास सांगण्यात आले. तसेच अनोळखी व्यक्तींना सोसायटीत प्रवेश न देण्याची दक्षता घेण्यास सांगण्यात आले होते. पीएमचा ताफा जाताना  कुणी टेरेसवर येणार नाही, मोबाइलमधून शुटिंग करणार नाही, एवढेच नाही तर दारे,खिडक्याच नाही, तर पडदेही ओढण्यास बजावले गेले होते. पडदे ओढण्याची सुचना म्हणजे,मात्र अतीच झालं, अशी प्रतिक्रिया ही नोटीस मिळालेल्या एका सोसायटीच्या अध्यक्षांनी दिली. या सुचनांचा भंग करुन सुरक्षिततेस बाधा पोचवली, तर कडक कारवाई करण्याचा इशाराही पोलिसांनी दिला होता.
Edited By - Amit Golwalkar

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in