राष्ट्रवादीचे आमदार सुनील शेळकेंना मावळात धक्का 

संतोष भेगडे हेच उमेदवार असतील, असे बुधवारी आमदार शेळके यांनी सांगितले होते.
NCP MLA Sunil Shelke hit in Mawal; Talegaon Deputy Mayor to BJP
NCP MLA Sunil Shelke hit in Mawal; Talegaon Deputy Mayor to BJP

पिंपरी : मावळ तालुक्‍यातील तळेगाव दाभाडे नगरपरिषदेच्या उपनगराध्यक्षपदाच्या आज (ता. 21 जानेवारी) झालेल्या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाचे सुशील सैंदाणे यांनी राष्ट्रवादी, कॉंग्रेस आणि मित्रपक्षप्रणित शहर सुधारणा समितीचे उमेदवार अरुण माने यांचा (राष्ट्रवादी) पराभव केला.

तो मावळचे राष्ट्रवादीचे आमदार सुनील शेळके यांना धक्का, तर माजी मंत्री आणि भाजपचे मावळचे माजी आमदार बाळा भेगडे यांचा विजय समजला जात आहे. कारण शेळके यांची सत्ता असलेल्या या नगरपालिकेत आता नगराध्यक्षानंतर उपाध्यक्षही भाजपचा झाला आहे. सुधारणा समितीच्या वैशाली दाभाडे (राष्ट्रवादी) यांच्या राजीनाम्यानंतर ही निवडणूक झाली होती. 

दरम्यान, ग्रामपंचायत निवडणूक निकालानंतर उपनगराध्यक्ष निवडणूक निकाल हा भाजपच्या मावळमधील उद्याच्या विजयाची नांदी असल्याची प्रतिक्रिया बाळा भेगडे यांनी देत मावळचा पुढील आमदार हा भाजपचा असेल, असेच सूचित केले. मावळच्या आमदारांना हा धक्का आहे का? असे विचारले असता त्यांना काय धक्के द्यायचे, ते मावळची जनता देईल, असा हल्लाबोल त्यांनी केला. 

राष्ट्रवादीकृत शहर सुधारणा समिती आणि स्थानिक जनसेवा विकास समिती नगपरिषदेत सत्तेत आहे. नगराध्यक्ष चित्रा जगनाडे या थेट जनतेतून निवडून आलेल्या आहेत. उपनगराध्यक्ष दाभाडे यांनी राजीनामा दिल्याने ही निवडणूक झाली. त्यात जनसेवा समिती तटस्थ राहिल्याने सैंदाणे हे 13 विरुद्ध सात मतांनी विजयी झाले. 

उपनगराध्यक्ष पदासाठी जनसेवा समितीला आपला उमेदवार उभा करायचा होता. मात्र, त्यावर एकमत झाले नाही. परिणामी नाराज जनसेवा समिती तटस्थ राहिली आणि नगरपरिषेदत उपनगराध्यक्षही भाजपचा झाला. ते पुन्हा सत्तेत आले. त्यामुळे भाजपने मोठा जल्लोष केला. 

राष्ट्रवादीच्या वतीने आज अरुण माने, संतोष भेगडे आणि भाजपच्या वतीने सुशील सैंदाणे यांनी उपनगराध्यक्ष निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल केले. भेगडे यांनी माघार घेतल्याने सैंदाणे आणि माने यांच्यात लढत झाली.

संतोष भेगडे हेच उमेदवार असतील, असे बुधवारी आमदार शेळके यांनी सांगितले होते. मात्र, भाजपचा उमेदवार ऐनवेळी म्हणजे आज सकाळी जाहीर करणार असल्याचे माजी आमदार बाळा भेगडे यांनीही बुधवारी स्पष्ट केले होते. मात्र, ऐनवेळी संतोष भेगडे यांनीच माघार घेतल्याने आश्‍चर्य व्यक्त करण्यात येत आहे. 

विधानसभेला मावळात भाजपचा पराभव झाल्याने त्यानंतर तळेगाव नगरपरिषदेतही भाजपला धक्का देत राष्ट्रवादीच्या वैशाली दाभाडे यांची उपनगराध्यक्षपदी निवड झाली होती. नगरपरिषदेत भाजप व जनसेवा विकास समितीची सत्ता असताना विधानसभा निवडणुकीतील भाजपच्या पराभवामुळे चित्र बदलले. भाजप विरोधी बाकावर गेला. परंतु जनसेवा विकास समिती व राष्ट्रवादी यांचे उपनगराध्यक्ष निवडणुकीत बिनसले आणि भाजपचा पुन्हा उपनगराध्यक्ष झाला. भाजपची पुन्हा सत्ता आली. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com