महेशदादांचा वाढदिवस कोरोना योद्ध्यांना समर्पित!

पिंपरी चिंचवडचे कारभारी आणि भोसरीचे भाजप आमदार महेशदादा लांडगे हे यावर्षीचा (ता.२७) आपला वाढदिवस कोरोनामुळे साजरा करणार नाहीत. त्याऐवजी गरजूंना मदत करण्याचे आवाहन त्यांनी फेसबुकवर केले.त्यांच्या या निर्णयाचे नेटीझन्सनी जोरदार स्वागत केले आहे.
 महेशदादांचा वाढदिवस कोरोना योद्ध्यांना समर्पित!
Mahesh Landge Not to Celebrate Birthday this year

पिंपरी: पिंपरी चिंचवडचे कारभारी आणि भोसरीचे भाजप आमदार महेशदादा लांडगे हे यावर्षीचा (ता.२७) आपला वाढदिवस कोरोनामुळे साजरा करणार नाहीत. त्याऐवजी गरजूंना मदत करण्याचे आवाहन त्यांनी  फेसबुकवर केले.त्यांच्या या निर्णयाचे नेटीझन्सनी जोरदार स्वागत केले आहे.

महेशदादांनी यावर्षीचा आपला वाढदिवस कोरोना योद्धयांना समर्पित करण्याचे ठरवले आहे.त्यामुळे  वाढदिवसानिमित्त कोणीही होर्डिंग लावू नयेत. कार्यक्रम, अभिष्टचिंतन सोहळा आयोजित करु नये. सोशल मीडियाद्वारे मला आपले शुभेच्छारुपी आशिर्वाद द्यावेत,असे विनंतीवजा आवाहन त्यांनी केली आहे

दरवर्षी दादांचे चाहते त्यांचा वाढदिवस दणक्यात करतात. मात्र, यावर्षी कोरोना महामारीमुळे परिस्थिती बिकट आहे.आमदारांचेच नाही, तर शहरातील अनेकांचे निकटवर्तीय कोरोनाने हिरावून नेले आहेत.हा  वेदनादायी अनुभव जमेस धरता अशा स्थितीत वाढदिवस साजरा करणे योग्य नाही,असे महेशदादांनी सरकारनामाला सांगितले. मात्र,सामाजिक बांधिलकी जपत, नियमांचे पालन करीत आपल्या परिसरातील गरजू नागरिकांना मदत केल्यास मला माझा वाढदिवस साजरा झाल्याचे निश्चितच समाधान मिळेल,असे आवाहन त्यांनी आपल्या हितचिंतकांना केले आहे.
Edited By- Amit Golwalkar

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in