आमदारकीला हरलेली आप ग्रामपंचायतीला जिंकली - Fifty Three Members of AAP Elected in Maharashtra Grampanchayat Elections | Politics Marathi News - Sarkarnama

आमदारकीला हरलेली आप ग्रामपंचायतीला जिंकली

उत्तम कुटे
मंगळवार, 19 जानेवारी 2021

विधानसभेला महाराष्ट्रात चंचूप्रवेश करण्यास अपयश आलेल्या आप या दिल्लीतील राजकीय पक्षाचा ग्रामपंचायत निवडणुकीत,मात्र महाराष्ट्रात शिरकाव झाला आहे. १८ ग्रामपंचायतीत त्यांचे ५३ सदस्य निवडून आले असून एका गावात (दापक्याळ,ता.चाकूर,जि.लातूर) ते विजयी झाले आहेत. मराठवाडा आणि विदर्भात आपची एंट्री झाली आहे.

पिंपरी : विधानसभेला महाराष्ट्रात चंचूप्रवेश करण्यास अपयश आलेल्या आप या दिल्लीतील राजकीय पक्षाचा ग्रामपंचायत निवडणुकीत,मात्र महाराष्ट्रात शिरकाव झाला आहे. १८ ग्रामपंचायतीत त्यांचे ५३ सदस्य निवडून आले असून एका गावात (दापक्याळ,ता.चाकूर,जि.लातूर) ते विजयी झाले आहेत. मराठवाडा आणि विदर्भात आपची एंट्री झाली आहे.

दापक्याळमधील यशाबद्दल खुद्द आपचे प्रमुख आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी विजेत्यांचे मराठीतून ट्विट करीत अभिनंदन केले आहे. जनतेने आपल्यावर दाखवलेल्या विश्वासाला सार्थ करा,जनतेची सेवा करा, असे सांगत त्यांनी पुढील कार्यास दापक्याळमधील नवनिर्वाचित ग्रामपंचायत सदस्यांना मराठीतून शुभेच्छा दिल्या आहेत. लातूर जिल्हाध्यक्ष प्रताप भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली दापक्याळमधील सातपैकी पाच जागा आपने जिंकून तेथे बहूमत मिळवले आहे. कमी शक्ती लागणाऱा ग्रामपंचायतीचा मतदारसंघ (प्रभाग) छोटा असल्याने तेथे आमच्यासारख्या छोट्या पक्षाला यश मिळाले आहे, असे आपचे राज्यातील प्रवक्ते डॉ. अभिजीत मोरे यांनी सांगितले.

ग्रामपंचायतीतील यशामुळे विश्वास दुणावलेल्या आम आदमी पक्ष तथा आपने आता राज्यातील आगामी सर्वच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लढविण्याचे ठरविले आहे, अशी माहिती डॉ. मोरे यांनी आज सरकारनामाला दिली.. त्यामुळे १३ महिन्यावर आलेल्या पिंपरी-चिंचवडसह पुणे महापालिका निवडणुकीच्या आखाड्यात आप उतरणार आहे. सव्वा वर्षापूर्वी झालेल्या राज्यातील विधानसभा निवडणुकीला आपने २५ जागा लढली होती. मात्र, त्यांना त्यात अपयश आले होते. मात्र,ग्रामपंचायतीच्या सत्तर जागा लढवून त्यापैकी ५३ ठिकाणी त्यांनी घवघवीत यश मिळवले. लातूरसह भंडारा, नागपूर,हिंगोली जिल्ह्यातील ग्रामपंचायतीत त्यांचे सदस्य निवडून आले आहेत.

Edited By - Amit Golwalkar

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख