कार्यकर्त्याची इच्छा पुरी, उदयनराजेंची बाईक सवारी! (व्हिडिओ)

उदयनराजे गुरुवारी कार्यकर्त्यांच्या कार्यकर्त्यांशी चर्चा करत होते. त्यावेळी एक कार्यकर्ता जलमंदिर पॅलेस येथे त्याची स्वत:ची नवी गाडी घेऊन जलमंदिर पॅलेस येथे आला. राजेंना त्याने गाडी दाखवताना त्यांनी ही गाडी चालवून पाहावी, असा त्याने आग्रह धरला. कार्यकर्त्यांचा आग्रह मान्य करत ते बाईकवर स्वार झाले. त्यांनी पहिला गिअर उचलत गाडी स्टार्ट करत स्पीड वाढवला​
Udayanraje Riding Motorcycle in Satara
Udayanraje Riding Motorcycle in Satara

सातारा : खासदार उदयनराजेंचा हटके अंदाज तरुणाईला नेहमीच भुरळ पाडत असतो. उदयनराजे कुठेही गेली तरी तरुणाईचा त्यांच्यासमोर गराडा असतोच असतो. कधी सेल्फी स्टाइल इस स्टाइल घेण्यासाठी, तर कधी त्यांच्याशी संवाद साधण्यासाठी. उदयनराजे त्यांच्या हटके अंदाजामुळे तरुणाईत भलतेच 'फेमस' आहेत. राजेंचे जगभरात मोठ्या प्रमाणात चाहते असून त्यांच्या हटके अंदाजासाठी त्यांना तरुणाई सोशल मीडियावर फाॅलो करत असतात. सध्या समाज माध्यमांत उदयनराजेंची मोठी क्रेझ पहायला मिळत असून व्हाॅटसअॅप, फेसबुक, इन्स्टाग्राम, व्टिटर या सारख्या माध्यमांत उदयनराजेंचा फाॅलोअर्स अधिक आहे.

उदयनराजेंना बाईक सवारी करणे अधिक पसंत असून त्यांनी वेळोवेळी याची प्रचिती दिली आहे. लोकसभा निवडणुकीत उमेदवारी अर्ज भरण्यासाठी उदयनराजेंची बुलेट सवारी करत आपला खासदारकीचा उमेदवारी अर्ज भरला होता. याची समाज माध्यमांवर खूपच चर्चा झाली. उदयनराजेंच्या गाडीचा ००७ हा नंबर तर तरुणांना भलताच पसंत पडला असून अनेकांनी आपल्या गाडीवरती हा क्रमांक उतरवून, 'एकच साहेब, महाराज साहेब' अशा प्रकारचे स्लोगन बनवले आहेत. खासदार उदयनराजेंचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर शेअर केला जात आहे. 

यात उदयनराजे भोसले एका बाईकवरुन साताऱ्यातील त्यांच्या जलमंदिराच्याच आवारातून रस्त्यापर्यंत बाईक रायडिंग करताना दिसत आहेत. उदयनराजेंचे चाहते जेव्हा नवीन बाईक विकत घेतात तेव्हा ते उदयनराजेंना जरुर दाखवायला येतातच. शिवाय गाडीत काही वेगळं केलं असेल तरीही ते उदयनराजेंना दाखवायला येतात. असच काहीसे गुरुवारी (ता. २२ ) घडले.

उदयनराजे गुरुवारी कार्यकर्त्यांच्या कार्यकर्त्यांशी चर्चा करत होते. त्यावेळी एक कार्यकर्ता जलमंदिर पॅलेस येथे त्याची स्वत:ची नवी गाडी घेऊन जलमंदिर पॅलेस येथे आला. राजेंना त्याने गाडी दाखवताना त्यांनी ही गाडी चालवून पाहावी, असा त्याने आग्रह धरला. कार्यकर्त्यांचा आग्रह मान्य करत ते बाईकवर स्वार झाले. त्यांनी पहिला गिअर उचलत गाडी स्टार्ट करत स्पीड वाढवला. जलमंदिर पॅलेसपासून ते नगरपालिकेच्या पोहण्याच्या तलावापर्यंत त्यांनी दोन राऊंड मारले. पण, हे राऊंड काही साधे नव्हते. राजे खुश असल्यामुळे त्यांच्या गाडीने केव्हा शंभरच्या पुढ वेग गाठला समजलेच नाही. उदयनराजेंच्या या हटके अंदाजाला अनेकांनी दाद देत हा अंदाज सोशल मीडियावर शेअर केला. त्यामुळे समाज माध्यमांत उदयनराजेंची किती क्रेझ आहे, याचा अंदाज नक्कीच आला असेल.

Edited By - Amit Golwalkar

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com