अजितदादा, तुमच्या सहकाऱ्यांनी खुळखुळा केलेला कारखाना पाच वर्षे चालवून दाखवला

तुमच्या शेजारी बसलेल्या बगलबच्च्यांनी किती कारखाने चालू ठेवून ऊस उत्पादकाला न्याय दिला, हे आधी सांगावे.
BJP candidate Samadhan Avtade's reply to Deputy Chief Minister Ajit Pawar's allegation
BJP candidate Samadhan Avtade's reply to Deputy Chief Minister Ajit Pawar's allegation

मंगळवेढा (जि. सोलापूर) : अजितदादा, तुमच्या सहकाऱ्यांनी खुळखुळा करून दिलेला संत दामाजी सहकारी साखर कारखाना पाच वर्षांत एकही गाळप हंगाम बंद न ठेवता अडचणीवर मात करत चालवून दाखवला, असे उत्तर दामाजी कारखान्याचे अध्यक्ष तथा भारतीय जनता पक्षाचे पंढरपूर पोटनिवडणुकीचे उमेदवार समाधान आवताडे यांनी दिले.

मंगळवेढा दौऱ्यात राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दामाजी कारखान्याने अक्रियाशील केलेल्या 19, 500 सभासदाच्या बद्दल बोलताना दामाजी कारखान्यात काय मोगलाई लागली काय, असा आरोप केला होता. त्या आरोपांना दामाजी कारखान्याचे अध्यक्ष, उमेदवार समाधान आवताडे यांनी तळसंगी येथे बोलताना उत्तर दिले. 

या वेळी व्यासपीठावर रयत क्रांती शेतकरी संघटनेचे दीपक भोसले, दामाजी कारखान्याचे उपाध्यक्ष अंबादास कुलकर्णी, संचालक सचिन शिवशरण, बसवेश्वर पाटील, राजेंद्र सुरवसे, माजी सभापती प्रदीप खांडेकर, आझाद दारूवाले, माऊली कौंडुभैरी उपस्थित होते 

आवताडे  म्हणाले की साखर कारखानदारी उद्योगामध्ये अडचणी भरपूर आहे. परंतु आमच्या संचालक मंडळाने त्या अडचणींवर मात करत कारखाना चालवून दाखवला आहे. पाच वर्षाच्या काळात एकही दिवस कारखान्याचा गळीत हंगाम बंद ठेवला नाही अथवा ऊस उत्पादकाला दुसऱ्या कारखान्याला ऊस घालावा म्हणून विनंती व तशी व्यवस्थादेखील केली नाही. आलेल्या सर्व अडचणींवर इतर कोणतेही उद्योग नसतानादेखील केवळ गाळपावर हा कारखाना चांगला चालवून दाखवला. 

आपल्या मंगळवेढा दौऱ्यात व्यासपीठावर तुमच्या शेजारी बसलेल्या बगलबच्च्यांनी किती कारखाने चालू ठेवून ऊस उत्पादकाला न्याय दिला, हे आधी सांगावे. जे सभासद कारखान्याला ऊस घालत नाहीत, त्यांना अक्रियाशील करण्याबाबतचा निर्णय हा मागील संचालक मंडळाने घेतला आहे. त्याबाबतची घटनादुरुस्ती नियमावली तुमच्या सरकारच्या काळात झाली, जर त्या नियमावलीची आम्ही अंमलबजावणी केली नसती, तर आमचे संचालक मंडळ निवडणूक लढवण्यास अपात्र ठरवले असते. या संदर्भात इतर कारखानदारांशी चर्चा केले व याबाबत मार्ग काढण्याचा निर्णय घेतला. त्या ऑनलाइन सर्वसाधारण सभेतून याबाबतचा ठराव मंजूर करून राज्य सरकारला पाठवून त्या सभासदांवर गंडांतर येईल, असा निर्णय घेतला जाणार नाही, असे समाधान आवताडे यांनी सांगितले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com