आमदार मुटकुळेंनी पाठीवर सोयाबीनचे पोते घेत ट्रॅक्टर केला खाली - Hingoli MLA Tanhaji Mutkule Working if Farm | Politics Marathi News - Sarkarnama

आमदार मुटकुळेंनी पाठीवर सोयाबीनचे पोते घेत ट्रॅक्टर केला खाली

राजेश दारव्हेकर
शुक्रवार, 18 सप्टेंबर 2020

आमदार मुटकुळे हे शेतात पेरणी, वखरणी, डवरणी आदी कामे देखील करतात. यामुळे शेतकरी कष्टकरी यांचे नेते म्हणून देखील परिचित आहेत. शेतकरी यांच्या पाठीशी ते सैदव उभे टाकलेले असतात. त्यामुळे ते साधी राहणी उच्च विचारसरणीचे म्हणून देखील त्यांची वेगळी ओळख आहे.

हिंगोली  :  हिंगोली विधानसभा मतदार संघाचे आमदार तान्हाजी मुटकुळे हे साधी राहणी उच्च विचार सरणीमुळे मतदार संघात परिचित आहेत. ते शेतीत देखील काम करतात सध्या उडीद काढणी सुरू असल्याने त्यांच्या शेतातील काढलेले उडीद घरी आणल्यावर त्यांनी बुधवार ता. १६  एक ते सव्वा क्विंटल चे पंधरा पोते पाठीवर  घेत ट्रँक्टर रिकामा केला. हा प्रकार पाहणारे सगळेच अवाक झाले होते. 

हिंगोली विधानसभा मतदार संघातून  एक वेळेस अल्पमताने पराभूत झाल्यानंतर त्यांनी  पुन्हा वडीलोपार्जित शेती करून भाजपाचा झेंडा खांद्यावर घेत २०१४ च्या निवडणुकीत ते विजयी झाले. ते शेतकरी असल्याने ते सिंचनाचा अनुशेष, कयाधू नदीवरील बंधारे असे विषय व इतर विकास कामांमुळे ते २०१९ च्या विधानसभा निवडणुकीतही दुसर्‍यांदा आमदार झाले. 
शेतीशी कायम बांधलेले असल्याने ते जनसंपर्क ठेवून आपल्या शेतातही वेळ देतात. यावर्षी त्यांनी  दहा एकर क्षेत्रावर उडीदाचा पेरा केला होता. 

बुधवारी मळणीयंत्रातून उडीद काढल्यानंतर त्यांच्या आडगाव येथील घरी शेतातून ट्रॅक्टरमध्ये आणलेले पोते त्यांनी स्वतः पाठीवर घेऊन घरामध्ये थप्पी लावली.  एका पोत्यात किमान सव्वा क्‍विंटल माल होता. हे पोते एका दमात उचलून अशी पंधरा पोती घरात टाकत युवकांनाही लाजवेल असे काम त्यांनी केले. आमदार असूनही शेतातील उडीदाचे पोते घरात टाकल्याने ग्रामस्थही अव्वाक झाले. त्यांचा हा व्हिडीओ समाज माध्यमावर  व्हायरल झाला असून त्यांच्या या साधेपणाचे कौतुक होत आहे.

आमदार मुटकुळे हे शेतात पेरणी, वखरणी, डवरणी आदी कामे देखील करतात. यामुळे शेतकरी कष्टकरी यांचे नेते म्हणून देखील परिचित आहेत. शेतकरी यांच्या पाठीशी ते सैदव उभे टाकलेले असतात. त्यामुळे ते साधी राहणी उच्च विचारसरणीचे म्हणून देखील त्यांची वेगळी ओळख आहे.
Edited By- Amit Golwalkar

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख