रोहित पवारांनी आमदार राजू पाटील यांना उद्देशून केले 'हे' ट्वीट

राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी मनसे आमदार राजू पाटील यांना उद्देशून ट्वीट करत लवकर बरे व्हा, अश्या शुभेच्छा दिल्या आहेत. त्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चा सुरु झाली आहे. यापूर्वी कधीही रोहित पवार आणि राजू पाटील एकत्र दिसले नाहीत. त्यामुळेच रोहित पवार यांच्या ट्वीटची चर्चा होते आहे.
Rohit Pawar - Raju Patil
Rohit Pawar - Raju Patil

डोंबिवली : मनसेचे एकमेव आमदार राजू पाटील यांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यांचे जोडीदार आणि मनसे जिल्हा संघटक हर्षद पाटिल हे सुद्धा कोरोना (Corona) पॉझिटीव्ह झाले आहेत. कोरोना पाॅझिटिव्ह झाल्यानंतर मनसे (MNS) आमदार यांची फेसबुक (Facebook) पोस्ट आता चांगलीच व्हायरल झाली आहे. (NCP MLA Rohit Pawar Tweet to MNS MLA Raju Patil)

आमदार पाटील आपल्या फेसबूक पोस्ट म्हध्ये म्हणतात....लस लवकरात लवकर दिली तर हे ही दिवस जातील. कोरोना होतो व झाल्यावर बरा पण होतो, त्याचा उगीचच बाऊ करण्यात अर्थ नाही. अनेक उदाहरणांवरून आपण बघतच आहोत की मास्क घातलेल्यांना कोरोना होतच नाही व मास्क न घातलेल्यांना कोरोना होतोच असे काही नाही. तन व मन स्वच्छ व positive ठेवले तर तुम्ही काही दिवस कोरोना negative राहू शकता. पण एक ना एक दिवस कोरोना सर्वांना होणारच. यामुळे आपल्याला त्याच्या सोबतच जगायचे आहे हेच वैद्यकीय सत्य आहे. कोरोना उपचार केंद्रांबरोबरच जास्तीत जास्त कोरोना लसीकरण केंद्र वाढवले व सरकारने सर्वांना कोरोनाची लस लवकरात लवकर दिली तर हे ही दिवस जातील असे आमदार राजू पाटील यांचे म्हणणे आहे.

दुसरीकडे राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी मनसे आमदार राजू पाटील यांना उद्देशून ट्वीट करत लवकर बरे व्हा, अश्या शुभेच्छा दिल्या आहेत. त्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चा सुरु झाली आहे. यापूर्वी कधीही रोहित पवार आणि राजू पाटील एकत्र दिसले नाहीत. त्यामुळेच रोहित पवार यांच्या ट्वीटची चर्चा होते आहे. 
Edited By - Amit Golwalkar

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com