अजित पवार पुन्हा भल्या पहाटे मेट्रोच्या पाहणीला - Ajit Pawar Inspected Pune Metro Work | Politics Marathi News - Sarkarnama

अजित पवार पुन्हा भल्या पहाटे मेट्रोच्या पाहणीला

सरकारनामा ब्युरो
शुक्रवार, 25 सप्टेंबर 2020

काही दिवसांपूर्वी अजित पवार पिंपरी येथे सकाळी साडेपाच वाजता मेट्रोच्या पाहणीसाठी गेले होते. त्यामुळे अधिकाऱ्यांची तारांबळ उडाली होती. आजही काहीशी तशीच स्थिती होती. पवार यांनी पुणे स्टेशनसह वनाज डेपो आणि शिवाजीनगर येथील कामांची पाहणी केली

पुणे : आपल्या कामाच्या वैशिष्ट्यपूर्ण शैलीसाठी प्रसिद्ध असलेले राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार आज पुन्हा एकदा मेट्रोच्या पाहणीसाठी पहाटे सहा वाजता रस्त्यावर उतरले. पुणे स्टेशन येथून त्यांनी मेट्रोच्या पाहणीला सुरुवात केली. मेट्रोचे काम वेळेत पूर्ण करा, अशा सूचना त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या.

काही दिवसांपूर्वी अजित पवार पिंपरी येथे सकाळी साडेपाच वाजता मेट्रोच्या पाहणीसाठी गेले होते. त्यामुळे अधिकाऱ्यांची तारांबळ उडाली होती. आजही काहीशी तशीच स्थिती होती. पवार यांनी पुणे स्टेशनसह वनाज डेपो आणि शिवाजीनगर येथील कामांची पाहणी केली. मेट्रोचे काम वेळेत पूर्ण करण्याच्या सूचना त्यांनी यंत्रणेला दिल्या.

उपमुख्यमंत्री पवार यांनी आज पुणे स्टेशन, व्हील पार्क डेपो (वनाज), शिवाजीनगर कृषी महाविद्यालय येथे पाहणी करून मेट्रोच्या कामाचा आढावा घेतला. महाराष्ट्र मेट्रो रेल कार्पोरेशनचे व्यवस्थापकीय संचालक ब्रिजेश दीक्षित यांनी मेट्रोच्या सुरू असलेल्या कामाबाबत सविस्तर माहिती दिली. 

पवार यांनी शिवाजीनगर येथे मॉडेल ट्रेनने प्रवास केला. शिवाजीनगर येथील बोगदा काम, व्हील पार्क (वानज) येथील कचरा डेपोचे अत्याधुनिक मेट्रो डेपोमध्ये रूपांतर करण्यात आले आहे. तेथील कामाचीही पवार यांनी पाहणी केली. मेट्रोच्या रेणू गेरा यांनी या मेट्रो डेपो उभारणीबाबत माहिती दिली. मेट्रोचे वरिष्ठ अधिकारी या वेळी उपस्थित होते.
Edited By- Amit Golwalkar

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख