नाशिक रोड : गरीब व सामान्य शेतकऱ्यांना तहसीलदारांनी आठवडाभरात लाखो रुपये वसुलीच्या नोटीसा दिल्या आहेत. हा तुकडेबंदीचा कायदा देवळालीसाठी लागूच नाही. या नोटीसीमुळे दहशत निर्माण झाली आहे. यादहशतीमुळे शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्यास कोण जबाबदार? असा प्रश्न शिवसेनेचे माजी आमदार योगेश घोलप यांनी प्रशासनाला विचारला आहे.
नाशिकच्या तहसीलदारांनी विविध शेतकऱ्यांना तुकडेबंदी कायद्यानुसार नोटीस दिली आहे. त्यासंदर्भात श्री. घोलप यांनी आज पत्रकार परिषदेत माहिती दिली. ते म्हणाले, मुळात देवळाली शिवारासाठी एकत्रीकरण कायदाच लागु नसल्याने सदर शिवारातील कुठल्याही मिळकत धारकाला महाराष्ट्र धारण जमिनीचे तुकडे पडण्यास प्रतिबंध करण्याबाबत व त्यांचे एकत्रीकरण करण्याबाबत (सुधारणा) अधिनियम २०१७ अथवा तत्पूर्वीच्या मूळ कायद्यातील कुठल्याही तरतुदी लागु होत नाही. तरीही ही नोटीस दिली आहे. हे योग्य नाही. या नोटीसीमुळे शेतकरी दहशतीखाली आले आहेत. या तणावातून कोणी आत्महत्या करण्याचा टोकाचा निर्णय घतेल्यास कोण जबाबदार राहील.
श्री. घोलप म्हणाले, “ प्रचलित प्रारूप किंवा अंतिम प्रादेशिक योजनेमध्ये निवासी, वाणिज्यिक, औद्योगिक, सार्वजनिक किंवा निमसार्वजनिक किंवा कोणत्याही अकृषीक वापराकरिता नियत वाटप केले असेल किंवा अशी जमीन, कोणत्याही खऱ्याखुऱ्या अकृषीक वापराकरिता वापरण्याचे उद्देशित केले असेल तर वार्षिक दर विवरण पत्रानुसार अशा जमिनीच्या बाजार मूल्याचा २५% पेक्षा अधिक नसेल. अशा शासन राजपत्रात वेळोवेळी अधिसुचित करील अशा प्रमाणातील नियमाधीनकरण अधिमुल्य प्रदान करण्याच्या अधीन राहुन, नियमाधीन करता येईल, असा हा कायदा आहे.
<iframe src="https://www.facebook.com/plugins/post.php?href=https%3A%2F%2Fwww.facebook.com%2FSarkarnamaNews%2Fposts%2F1526596300883315&width=350&show_text=true&height=380&appId" width="350" height="380" style="border:none;overflow:hidden" scrolling="no" frameborder="0" allowfullscreen="true" allow="autoplay; clipboard-write; encrypted-media; picture-in-picture; web-share"></iframe>ते म्हणाले, कायद्यातील वरील तरतुद पाहता ज्या मिळकत धारकाचा त्याची तुकडा असलेली मिळकत हि कुठल्याही प्रयोजनासाठी बिनशेती करण्याचा त्याचा उद्देश असेल तरच सदर सुधारणा कायद्या नुसार त्यास बाजार मुल्य दराच्या २५ टक्के रक्कम अधिमुल्य म्हणुन असा तुकडा नियमित करून घ्यावयाचा आहे मुळामध्ये नोटीसधारक वरील नमुद मिळकतीत शेती करीत असुन आमचा सदर मिळकत बिनशेती करण्याचा कुठलाही उद्देश नसल्याने त्या अनुषंगाने देखील आपली संदर्भीय नोटीस धारकांना लागु होत नाही. त्यामुळे या नोटीसींचा फेरविचार करण्यात यावा. अन्यथा या नियमबाह्य कामकाजाबाबत संबंधीतांची तक्रार करुन आंदोलन छेडण्यात येईल.
.....

