बाळासाहेब ठाकरेंनी धीर दिल्यानंतर मी व प्रवीण दरेकर रडलो !

शिवसेना आमची आई आहे. काही दिवसांसाठी मावशीकडे राहायला गेलो होते एवढेच. राजकीय परिस्थितीमुळे पक्ष सोडावा लागला तरी आता परतलो आहे. आम्ही पक्षात आलो म्हणजे कोणाच्या पदाला धक्का लागेल असे मानू नका.
Vsant Gite
Vsant Gite

नाशिक : शिवसेना आमची आई आहे. काही दिवसांसाठी मावशीकडे राहायला गेलो होते एवढेच. राजकीय परिस्थितीमुळे पक्ष सोडावा लागला तरी आता परतलो आहे. आम्ही पक्षात आलो म्हणजे कोणाच्या पदाला धक्का लागेल असे मानू नका. सांगाल त्या पदावर, त्या ठिकाणी एकत्रितपणे काम करू, अशी ग्वाही वसंत गिते व सुनील बागूल यांनी दिली.

माजी आमदार गिते व श्री. बागूल दोघांनी गेल्या आठवड्यात शिवसेनेत प्रवेश केल्यावर सोमवारी नाशिकला शिवसेना भवनमध्ये त्यांचा सत्कार करण्यात आला. त्या वेळी ते बोलत होते. प्रारंभी फटाक्यांच्या आतषबाजीत, ढोल-ताशांच्या गजरात स्वागत करण्यात आले. श्री. गिते १३ वर्षांनी, तर बागूल आठ वर्षांनी शिवसेना भवनमध्ये परतले. 

या वेळी गिते व बागूल यांनी जुन्या आठवणींना उजाळा दिला. आमच्याकडून ९९.९९ टक्के अडचण होणार नाही; मात्र व्यासपीठाकडे बघत आम्हालाही त्रास होऊ देऊ नका, असे आवाहन केले. नाशिकसह उत्तर महाराष्ट्रातील महापालिका, जिल्हा परिषदांवर भगवा फडकविण्याचा संकल्प करण्यात आला. श्री. घोलप म्हणाले, की शिवसेनेला आता सुगीचे दिवस आलेत. पक्षात जुना-नवा वाद निर्माण न करता शिवसेना नव्या जोमाने उभी करण्याचे आवाहन केले. जिल्हाप्रमुख विजय करंजकर यांनी सख्खे भाऊ शिवसेनेत परतल्याची भावना व्यक्त केली. गिते-बागूल यांच्या शिवसेना प्रवेशामुळे निवडणुका जिंकणे सोपे झाल्याचा आशावाद व्यक्त करताना महानगरप्रमुख बडगुजर यांनी निवडणुकांत निष्ठावंतांचा पहिला विचार केला जाणार असल्याचे सांगितले. विरोधी पक्षनेते बोरस्ते यांनी शिवसेनेला गतवैभव प्राप्त होण्याचा विश्‍वास व्यक्त केला.

मावशीकडून आईकडे परतलो 
श्री. गिते म्हणाले, बारा वर्षे मी मनसेकडे म्हणजे मावशीकडे होतो. आता पुन्हा शिवसेना म्हणजे आईकडे परतलो आहे. कारस्थानांमुळे शिवसेना सोडायला लागली. पक्षनेतृत्वाने आदेश दिल्याने परतलो. चार भिंतीत बसून मनभेद व मतभेद मिटवू. आता यापुढे फक्त नाशिकच नव्हे, तर उत्तर महाराष्ट्रात भगवा फडकवू. मनसेकडून आमदार झाल्यानंतर ‘मातोश्री’वर गेलो होतो. घरातले भांडण संपविण्याची विनंती साहेबांना केली होती. (कै.) बाळासाहेबांनी धीर दिल्यानंतर मी व प्रवीण दरेकर रडलो होतो. शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर ‘मातोश्री’वर गेलो तेव्हा स्मृती जाग्या झाल्या. परंतु, पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मागील आठवणी काढण्याची वेळच येऊ दिली नाही. पक्षातील भांडणे पक्षातच मिटविण्याचे आवाहन त्यांनी केले.

या वेळी शिवसेना उपनेते बबन घोलप, माजी महापौर विनायक पांडे, माजी जिल्हाप्रमुख दत्ता गायकवाड, जिल्हाप्रमुख विजय करंजकर, महानगरप्रमुख सुधाकर बडगुजर, विरोधी पक्षनेते अजय बोरस्ते, गटनेते विलास शिंदे, महिला आघाडीच्या प्रमुख सत्यभामा गाडेकर, माजी महापौर अ‍ॅड. यतिन वाघ, सचिन मराठे, भाऊलाल तांबडे, योगेश बेलदार आदी उपस्थित होते. 
...
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com