वाराणसीचे जोडपे म्हणते....हौसला है, गांव तक जानेका!

वाराणसीहून पोटासाठी मुंबईला आलेल्या एका जोडप्याने दोन लहानग्यांसह मुंबई ते नाशिक पायी प्रवास केलाय. "कोरोना'मुळे अडकलेल्या या जोडप्याला आता गावाची ओढ लागली आहे. सोळाशे किलोमीटरचे हे अंतर त्यांच्या या विश्‍वासापुढे "बस पहुचही जाऐंगे' या वाक्‍या एव्हढेच आहे.
Couple with Two Kids Walking from Mumbai to Varanasi.
Couple with Two Kids Walking from Mumbai to Varanasi.

नाशिक : उत्तर प्रदेशमधील वाराणसीहून पोटासाठी मुंबईला आलेल्या एका जोडप्याने दोन लहानग्यांसह मुंबई ते नाशिक पायी प्रवास केलाय. 'कोरोना'मुळे अडकलेल्या या जोडप्याला आता गावाची ओढ लागली आहे. त्यामुळे मार्गात कोणताही अडथळा आला तरी त्यावर मात करण्याचा आत्मविश्‍वास घेऊन ते पुढे निघाले आहेत. सोळाशे किलोमीटरचे हे अंतर त्यांच्या या विश्‍वासापुढे 'बस पहुचही जाऐंगे' या वाक्‍या एव्हढेच आहे. 

श्‍यामसुंदर हा आठवी शिकलेला. तो मिरा-भाईंदरला कार चालकाचे काम करत होता. पत्नी क्षमा ही बारावी शिकलेली घरकामच करत होती. त्यांच्या विवाहाला तीन वर्ष झाली आहेत. त्यांना अनू, आर्यन ही दोन गोजिरवाणी मुलं आहेत. त्यातील आर्यन अवघ्या अकरा महिन्यांचा. मुंबईहून पायपीठ करीत त्यांनी उत्तर प्रदेशाची वाट धरली आहे. उत्तर प्रदेशमधील चंदौली जिल्ह्यातील बगेया गावी ते पायी निघाले आहेत. मंगळवारी सकाळी ते नाशिकला पोहोचले. महामार्गालगत असलेल्या अन्नक्षेत्रातील कार्यकर्त्यांनी श्‍यामसुंदर व क्षमा यांना जेवण दिले. शिवाय कडेवर दोन चिमुकले दिसल्याने त्यांनी १५ दिवस पुरेल एवढ्या दुधाची व्यवस्था खास व्यवस्था करण्यात आली. 

प्रवास मायभूमीच्या ओढीमुळे

मायभूमीच्या ओढीने शेकडो तरुण मुंबई-आग्रा महामार्गावरुन दररोज जात आहेत. कोणी पायपीट करीत तर कोणी सायकलवर. दररोज शेकडो किलोमीटर प्रवास करणाऱ्या वाहनचालकावर पायपीट करण्याची लॉकडाऊनमुळे वेळ आली आहे. मीरा-भाईंदर येथे ओला गाडीवर चालकाचं काम करणाऱ्या श्‍यामसुंदरचं काम लॉकडाऊनमुळे बंद झालं. उपासमार होऊ लागल्याने गावची वाट धरली. 

गाडी बंद झाल्याने घरखर्च भागेना

ओला गाडी चालवण्याचे दरदोज सातशे पन्नास रुपये मिळत होते. त्यात चांगलं भागत होतं. आर्यन आणि अनु या चिमुकल्यांचा दुधाचा खर्च, घर खर्च निघत होता, व्यवस्थित सुरु होतं. पण लॉकडाऊनमुळे मालकाने गाडी बंद केली. त्यामुळे पगार बंद ही भुमिका घेतली. त्यांच्याकडे पाच गाड्या आहेत. शिवाय व्होडाफोनची एजन्सीही आहे. तरीही पैसे देण्यास नकार दिला. त्यामुळे मालक व चालक श्‍यामसुंदर यांच्या मोठा वादही झाला उपासमार होवू लागली. मग श्‍यामसुंदरने आई वडिलांकडे घरी जाण्याचे ठरवले.

थोडे फार पैसे होते तेही या लॉकडाऊनच्या काळत संपले. उत्तर प्रदेशमधील चंदौली जिल्ह्यातील बगेया हे गाव. सध्या गावी ८२ वर्षांचे वडील, ७५ वर्षांची आई, लहान भाऊ आहे. श्‍यामसुंदर गावाकडे जाण्यासाठी निघाला आहे. पत्नी, मुले यांच्या शिवाय जीवलग मित्र रिझवान अहमद, देवेंद्र यादव हेही बरोबर आहेत. रस्त्याने चालताना लहान मुलांना आळीपाळीने ते कडेवर, हातावर घेतात. 
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com