तुकाराम मुंढे म्हणाले, "नाशिकची घटना सुन्न करणारी' 

ऑक्‍सिजन टॅंकचा पाईप तुटल्याने पुरवठा बंद होऊन महापालिकेच्या डॉ. झाकीर हुसेन रुग्णालयात उपचार घेणारे चोविस रुग्ण दगावले. या घटनेसंदर्भात चर्चीत सनदी अधिकारी तुकाराम मुंढे यांनी ट्‌विटद्वारे आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. ते म्हणाले, ही घटना मन सुन्न करणारी आहे.
Tukaram Munde
Tukaram Munde

नाशिक : ऑक्‍सिजन टॅंकचा पाईप तुटल्याने पुरवठा बंद होऊन महापालिकेच्या डॉ. झाकीर हुसेन रुग्णालयात उपचार घेणारे चोविस रुग्ण दगावले. या घटनेसंदर्भात चर्चीत सनदी अधिकारी तुकाराम मुंढे यांनी ट्‌विटद्वारे आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. ते म्हणाले, ही घटना मन सुन्न करणारी आहे. 

यासंदर्भात श्री. मुंढे म्हणाले, "नाशिकची घटना अत्यंत मन हेलावून टाकणारी आहे. दुर्दैवी व वेदनादायक घटनेने मन सुन्न झाले. मी निशब्द झालो. सर्व रुग्णांना भावपूर्ण श्रद्धांजली. श्री. मुंढे यांचे ट्विट सर्वदूर रिट्विट करण्यात आले आहे. 

महापालिकेच्या डॉ. झाकीर हुसेन रुग्णालयात काल साडे बाराला ऑक्‍सिजनच्या टाकीच्या कॉकला तडे गेले. त्याने ऑक्‍सिजन रिफीलींग करताना गळती झाली. त्यात रुग्णालयाचा ऑक्‍सिजनचा पुरवठा दिड तास बंद पडला. त्यात चौविस रुग्णांचे प्राण गेले. याविषयी पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांसह अनेकांनी संवेदना व्यक्त केल्या. आरोग्यमंत्री राजेश टोपे, पालकमंत्री छगन भुजबळ, महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांसह विविध नेत्यांनी भेट देऊन पाहणी केली. यामध्ये भाजपचे प्रविण दरेकर आणि सुधीर मुनगंटीवार यांच्याही प्रतिक्रीया होत्या. 

या पार्श्‍वभूमीवर अतिशय शीस्तबद्ध आणि प्रशासनावर मांड असलेले मुंढे यांचे ट्विट बोलके आहे. श्री. मुंढे आपल्या कडक शीस्त व प्रशासनातील शीस्तीसाठी प्रसिद्ध आहेत. ते नाशिकला महापालिका आयुक्त होते. त्यांच्या कारकिर्दीत अनेक नवीन परंपरा व शीस्तीचे धडे महापालिका प्रशासनाने गिरवले होते. श्री. मुंढे आठवड्यातून एक दिवस आयुक्त तुमच्या भेटीला हा उपक्रम करीत असत. त्याला सर्व नागिरकांचा मोठा प्रतिसाद मिळत असे. नागरिकांचे प्रश्‍न तीथल्या तीथे सोडविले जात असल्याने नागिरकांत ते अतिशय लोकप्रिय होते. मात्र भारतीय जनता पक्षाची सत्ता असलेल्या या महापालिकेत नगरसेवकांची कोंडी झाल्याने त्यांनी त्यांच्या विरोधात अविश्‍वास ठराव आणला होता. विशेष म्हणजे त्यात सगळेच नगरसेवक सहभागी झाले. कालच्या घटनेने नागिरकांना श्री. मुंढे यांच्या शिस्तीची आठवण झाली. 
... 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com