नाशिकमध्ये शिवसेना भाजपला आणखी भगदाड पाडणार?

सातपूरमधील भारतीय जनता पक्षाला मोठे भगदाड पडणार असून, या भागातील भाजपचे अनेक नेते शिवसेनेच्या संपर्कात आहेत. हा परिसर आता पूर्णतः शिवसेनामय बनणार आहे. महापालिका निवडणुकीत शिवसेनेला सर्वच्या सर्व जागा मिळतील.
Sudhakar Badgujar
Sudhakar Badgujar

नाशिक : सातपूरमधील भारतीय जनता पक्षाला मोठे भगदाड पडणार असून, या भागातील भाजपचे अनेक नेते शिवसेनेच्या संपर्कात आहेत. हा परिसर आता पूर्णतः शिवसेनामय बनणार आहे. त्यामुळे आगामी महापालिका निवडणुकीत शिवसेनेला सर्वच्या सर्व जागा मिळतील, असा विश्वास शिवसेना महानगरप्रमुख सुधाकर बडगुजर यांनी व्यक्त केला.

शहरातील सातपूरमधील प्रभाग दहामध्ये शिवसेनेच्या चार नूतन शाखांच्या उद्‌घाटनाप्रसंगी ते बोलत होते. जिल्हाप्रमुख विजय करंजकर, माजी जिल्हाप्रमुख सुनील बागूल, माजी महापौर विनायक पांडे, राजू लवटे, मनपाचे विरोधी पक्षनेते अजय बोरस्ते, गटनेते विलास शिंदे, ‘भाविसे’चे जिल्हाध्यक्ष वैभव ठाकरे, नगरसेवक प्रवीण तिदमे, डी. जी. सूर्यवंशी, संतोष गायकवाड, मधुकर जाधव, नैना गांगुर्डे, देवा जाधव आदी प्रमुख पाहुणे होते. शिवसेना शाखाप्रमुख योगेश बडदे, अविनाश सोनवणे, राहुल डोंगरे, हर्शल आहेर यांचा सत्कार झाला.

श्री. बडगुजर म्हणाले, की सातपूरमध्ये औद्योगिक वसाहत आहे. सर्वाधिक महसूल देणार हा परिसर असल्याने या भागाचा सर्वांगीण विकास होणे गरजेचे होते. मात्र, तसे झाले नाही. मूलभूत सुविधांचा अभाव असल्याने अनेक कारखाना मालकांनी येथून पळ काढला. अनेक कामगारांच्या नोकऱ्याही गेल्या. त्यामुळे त्यांच्यातही असंतोष आहे. भाजपच्या आडमुठ्या धोरणांमुळेच ही परिस्थिती निर्माण झाली आहे. या कामगारांना न्याय मिळवून द्यायचा असेल, तर भाजपला सत्तेवरून खाली खेचणे हाच त्यावर एकमेव पर्याय असून, २०२२ च्या महापालिका निवडणुकीत जनता भाजपला त्यांची जागा दाखवून देईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

शाखांचे उद्‌घाटन, वसंत गिते आणि सुनील बागूल यांच्या घरवापसीमुळे आता अनेक लोक आणि विशेषतः तरुणवर्ग शिवसेनेशी जोडला गेला असून, महानगरात आता सर्वत्र शिवसेनामय वातावरण निर्माण झाले आहे. त्याचा लाभ उठवून शिवसैनिकांनी महापालिकेत परिवर्तन घडवून आणण्यास सज्ज राहावे. भाजपचे नेते गैसममज पसरवून संभ्रम निर्माण करीत आहेत. त्यांचा हा डाव आम्ही हाणून पाडू, असेही ते म्हणाले.

यावेळी लोकेश गवळी, आनंद दिघोळे, किशोर निकम, चेतन उगले, नरेश सोनवणे, संग्राम करंजकर, सचिन निकम, मंगेश पवार, संदीप भोजने, प्रसाद करंजकर, वैभव ढिकले, साहेबराव जाधव, बापू बाविस्कर, सुनील मोरे, गोकुळ निगळ, मुरलीधर पाटील, दामोदर पाटील, बाळासाहेब लाबे, नंदू जाधव, गणेश शेलार, पिंटू बोडके, डॉ. वृषाली सोनवणे, पिंटू बोडके, सुनील जाधव, शुभम कदम, संग्राम पाटील आदी उपस्थित होते.
...
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com