संजय राऊत यांच्या दौयात कोणते नेते शिवसेनेच्या गळाला लागणार? - Sanjay Raut in Nashik Thursday Which BJP leader in Touch | Politics Marathi News - Sarkarnama

संजय राऊत यांच्या दौयात कोणते नेते शिवसेनेच्या गळाला लागणार?

सरकारनामा ब्युरो
मंगळवार, 5 जानेवारी 2021

शिवसेनेचे उत्तर महाराष्ट्र संपर्क प्रमुख खासदार संजय राऊत गुरुवारी नाशिक दौयावर येत आहेत. या दौयात ते भाजपच्या दोन प्रदेश उपाध्यक्षांशी चर्चा करणार आहेत. हे दोन नेते वसंत गिते व सुनिल बागुल असल्याचे बोलले जाते.

नाशिक : शिवसेनेचे उत्तर महाराष्ट्र संपर्क प्रमुख खासदार संजय राऊत गुरुवारी नाशिक दौयावर येत आहेत. या दौयात ते भाजपच्या दोन प्रदेश उपाध्यक्षांशी चर्चा करणार आहेत. हे दोन नेते वसंत गिते व सुनिल बागुल असल्याचे बोलले जाते. या दोघांनी अशी कुठलीचं चर्चा नसल्याचे सांगितले आहे. शिवसेनेच्या नेत्यांनी मात्र अनेक नेते संपर्कात असल्याचे सांगत भाजपला चुचकारण्याचा प्रयत्न केला आहे. त्यामुळे नक्की कोणते नेते संपर्कात आहेत याबाबत उत्सुकता वाढली आहे. 

राज्यात महाविकास आघाडीचे सरकार स्थापन झाल्यानंतर भाजप व शिवसेनेत द्वंद सुरु झाले आहे.  भाजपकडून शिवसेनेला सतत टार्गेट केले जात आहे. शिवसेना नेत्यांना `ईडी`च्या नोटीस पाठवून बेजार करण्याचा धडाका सुरु आहे.  शिवसेनेही राज्य सरकारच्या माध्यमातून भाजपला शह देण्याचा प्रयत्न होत आहे. याचाच एक भाग म्हणून शिवसेनेसोबतचं राष्ट्रवादीकडून देखील भाजपच्या नेत्यांना पक्ष निमंत्रणाचे प्रयत्न होत आहेत. माजी मंत्री एकनाथ खडसे यांना राष्ट्ववादी मध्ये घेवून भाजपला मोठा दणका दिला होता. भाजप विरुध्द शिवसेना-राष्ट्रवादी या शह-काटशहाचाचं एक भाग म्हणून नाशिकमध्ये देखील राजकीय उलथापालथ होण्याची शक्यता वर्तविली जात आहे.

भाजपचे दोन प्रदेशाध्यक्ष पक्षाला सोडचिठ्ठी देत शिवसेनेत प्रवेश करण्याच्या तयारीत असल्याची चर्चा आहे. या दोन उपाध्यक्षांमध्ये माजी महापौर वसंत गिते व सुनिल बागुल यांची नावे आघाडीवर आहेत. मिसळ पार्टीतून मित्रांचा गोतावळा एकत्र करण्याबरोबरचं ताकद त्यांनी दाखवून दिली आहे. गिते यांची मिसळ पार्टी यशस्वी झाल्यानंतर त्यांच्या पक्षांतराच्या चर्चेला उधाण आले. गिते व बागुल दोघेही पुर्वाश्रमीचे शिवसेनेचे आहेत. भाजपने त्यांना मोठी पदे दिली. मात्र मध्यंतरीच्या काळात मतभेद झाले. श्री. गिते मनसे व आता भाजप मध्ये आहे. श्री. बागुल यांनी पहिल्यांदा राष्ट्रवादी व आता भाजपचा झेंडा घेतला आहे. दोघेही भाजपमध्ये नाराज आहेत. दोघांनाही शिवसेनेत आणन्यासाठी शिवसेनेचे नेते प्रयत्न करीत आहेत. दोघेही भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष असल्याने पक्षातच राहतात की पक्षांतर करतात याची चर्चा आहे. 

गुरुवारी राऊत नाशिकमध्ये
खासदार संजय राऊत दोन दिवसांनी नाशिक मध्ये येणार असल्याचे शिवसेनेच्या नेत्यांनी सांगितले. गुरुवारी (ता. 7) त्यांचा दौरा निश्चित Eus. या दौयात ते भाजपला शह देण्यासाठी भाजपच्या दोन मोठ्या नेत्यांशी शिवसेना पक्ष प्रवेशासंदर्भात चर्चा करणार असल्याचे बोलले जात आहे. ते कुठल्या भाजप नेत्याशी चर्चा करणार आहे याबाबत माहिती नसल्याचे महानगरप्रमुख सुधाकर बडगुजर यांनी सांगितले. मात्र भाजपचे अनेक नेते शिवसेनेच्या संपर्कात असल्याची पुस्ती त्यांनी जोडली. 
...
 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख