फार्म हाऊसवरील हुक्का पार्टीवर मध्यरात्री पोलिसांचा छापा

गंगापूर धरणा लगतच्या प्रतिष्ठीतांच्या फार्म हाऊसवर कोरोनाचे निर्बंध झुगारून सुरु असलेल्या हुक्का पार्टीवर पोलिसांनी काल कारवाई केली. पार्टी चांगलीच रंगात आली असतांना झालेल्या या कारवाईत अडतीस युवक- युवतींना पोलिसांनी ताब्यात घेतले. त्यामुळे मध्यरात्री पोलिस ठाण्यावर पालकांनी गर्दी केली होती.
Hukka Party
Hukka Party

गिरणारे : गंगापूर धरणा लगतच्या प्रतिष्ठीतांच्या फार्म हाऊसवर कोरोनाचे निर्बंध झुगारून सुरु असलेल्या हुक्का पार्टीवर पोलिसांनी काल कारवाई केली. पार्टी चांगलीच रंगात आली असतांना झालेल्या या कारवाईत अडतीस युवक- युवतींना पोलिसांनी ताब्यात घेतले. त्यामुळे मध्यरात्री पोलिस ठाण्यावर पालकांनी गर्दी केली होती.  

गंगापूर धरणालगतच्या फार्म हाऊसवर जिल्हा पोलिसांनी आज मध्यरात्री दोनला कारवाई केली. यावेळी हुक्का व विना परवाना तंबाखू सेवन करीत असलेले अडतीस तरुण, तरुणींना तांब्यात घेण्यात आले. अन्य सतरा लोक त्यांना सेवा देक होते. कोरोनाच्या काळात रात्रीची संचारबंदी लागू करण्यात आली आहे. कोरोनाचा संसर्ग होऊ नये यासाठीचे नियम धाब्यावर बसवून येथे हुक्का पार्टी सुरु होती. हुक्कासाठी लागणारे साहित्य, तंबाखू, महागड्या तंबाखूची पाकीटे तसेच हुक्का आदी साहित्य यावेळी पोलिसांनी ताब्यात घेतले. 

पोलिस अधीक्षक सचीन पाटील स्वतः आपल्या पथकासह घटनास्थळी कारवाईसाठी गेले होते. या भागात शेकडो फार्म हाऊस आहेत. अनेक प्रतिष्ठीत, व्यावसायिक, राजकीय नेते व लोकप्रतिनिधींचे फार्म हाऊस तसेच विविध वाईनरीज आहेत. येथे रोजच पार्टी व स्नेहमेळावे रंगतात. मात्र हुक्का पार्टी व त्यावरील कारवाईने या फार्म हाऊसच्या मालकांनी त्याचा चांगलाच धसका घेतला. या भागात गंगापूर व काश्यपी हे दोन धरण आहेत. त्यामुळे अनेक हॉटेल्सचे व्यवसाय सुरु झाले आहेत. या भागात यापूर्वीही पोलिसांनी कारवाई केली आहे. मात्र हे प्रकार अद्याप नियंत्रणात आलेले नाहीत, असे स्थानिक नागरिकांनी सांगितले. 

दरम्यान सध्या शहर व जिल्ह्यात कोरोनाचे रुग्ण वाढत आहे. त्याच्या नियंत्रणासाठी जिल्हा प्रशासन विविध स्तरावर प्रयत्न करीत आहे. प्रतंबंधात्मक उपाययोजना केल्या जात आहेत. शहर, जिल्ह्यात कोविड संदर्भातले नियम सर्वसामान्य काटेकोरपणे पालन करत असताना अनेक हॉटेल्स बार मात्र आपल्या व्यवसायाचा अट्टाहास सोडत नाही हे सातत्याने दिसून येत आहे. नागरीक देखील स्वतःवर नियंत्रण ठेवत नाहीत अशी परिस्थिती आहे. उघडकीस आलेल्या या घटनेने शहरालगतच्या ग्रामीण भागात दररोज चालणारा तरूणाईचा धुडगूस पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे, असे या भागातील नागरिकांनी सांगितले. 
.....
कोरणा बाबत काळजी घेण्याची जबाबदारी आता स्वतः नागरिकांची आहे मात्र नागरिकच नियम पाळत नाहीत. त्यांनीच नियम पाळले नसतील तर प्रशासन कारवाई करणारच. नागरिकांनी स्वतःहून आपली बंधन पाळण्याची गरज आहे. 
- सचिन पाटील पोलिस अधीक्षक (ग्रामीण)
...

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com