देवेंद्र फडणवीस संजय राऊतांना काय उत्तर देणार?

शिवसेना नेते संजय राऊत यांनी नाशिक दौरा करुन भाजपवर गंभीर आरोप केले. नेत्यांना फोडले. या पार्श्वभूमीवर माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा दौरा होत आहे. ते काय उत्तर देतात याची उत्सुकता आहे.
Phadanvis- Raut
Phadanvis- Raut

नाशिक : गेल्या काही दिवसांत शिवसेना नेते, खासदार संजय राऊत यांनी दौरे करुन नाशिकच्या शिवसेनेला चांगलीच गती दिली. भाजपच्या नेत्यांची फोडले. या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पक्षानेही तयारी सुरु केली आहे. उद्या (ता.13) विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस नाशिकच्या दौ-यावर येत आहेत. फडणवीस राऊतांना कसे उत्तर देतात याची उत्सुकता आहे. 

माजी मुख्यमंत्री व विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांच्या नाशिक दौऱ्याच्या व स्वागताची  तयारी करण्यासाठी पक्षाची बैठक झाली. यावेळी नुकतेच स्वगृही परतलेल्या माजी आमदार व नवनर्वाचित प्रदेश उपाध्यक्ष बाळासाहेब सानप यांचे उत्साहात स्वागत झाले. 

महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री व विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस बुधवारी नाशकात येत आहेत. भाजप कार्यालयात गिरीश पालवे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. यावेळीं नवनर्वाचित प्रदेश उपाध्यक्ष बाळासाहेब सानप यांनी आपण पक्षाच्या कार्यासाठी आपण स्वतःला वाहून घेऊ असे सांगून आपण कार्यकर्त्यांच्या समस्या सोडविणसाठी सतत उपलब्ध राहू असे सांगितले 

फडणवीस यांच्या स्वागतासाठी विविध कार्यक्रम होणार आहेत. सुरुवातीला पाथर्डी फाटा येथे छत्रपती श्री शिवाजी महाराज पुतळ्याजवळ ढोल ताशांच्या गजरात स्वागत करण्यात येणार आहे. फडणवीस यांच्या स्वागतासाठी मार्गावर स्वागताचे बोर्ड लावून रस्ते सुशोभित करण्यात येतील. त्यासाठी प्रत्येक पदाधिकारी नगरसेवकांनी फलक लावावेत. त्यामुळे शहरात भाजपसाठी राजकीय वातावरण निर्मिती होईल. देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते संघटन मंत्री नाना नवले  यांच्या  जीवनावरील पुस्तकाचे प्रकाशन, पत्रकार संघाचे पुरस्कार वितरणतर, देशस्थ ऋग्वेदी संस्थेच्या नूतन वास्तूचे उदघाटन आदी कार्यक्रम होतील. या  दरम्यान ते शिवसेनेकडून गेले काही दिवस भाजपच्या स्थानिक कारभारावरील टिका, खासदार राऊत यांनी केलेले आरोप, भंडारा येथील बालकांचा दुर्दैवी मृत्यू आणि भाजप नेत्यांच्या सुरक्षा व्यवस्थेत केलेली कपात या पार्श्वभूमीवर काय उत्तर देतात याची उत्सुकता आहे.

यावेळी महापौर सतीश कुलकर्णी, शहर सरचिटणीस प्रशांत जाधव, जगन पाटील, आमदार राहुल ढिकले, प्रदीप पेशकर, महापालिका सभागृह नेते सतीश सोनवणे, सुहास फरांदे, पवन भगूरकर, सुनील केदार, स्वाती भामरे, आध्यत्मिक आघाडी प्रदेश संयोजक तुषार भोसले, पंचवटी प्रभाग सभापती शीतल माळोदे, कोमल मेहरोलिया, ॲङ श्याम बडोले, पवन भगूरकर, सुनील केदार आदी उपस्थित होते.
...
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com