महानिरीक्षक दिघावकरांचा करिष्मा, २४ तासात पैसे परत!

नेपाळच्या कांदा व्यापाऱ्याचे पैसे घेवून ते देण्यास टाळाटाळा करत असलेल्या नाशिकच्या व्यापाऱ्याविरूद्ध विशेष पोलिस महानिरीक्षक डॉ. प्रताप दिघावकर यांच्याकडे तक्रार आली होती.
Pratap Dighavkar
Pratap Dighavkar

नाशिक : नेपाळच्या कांदा व्यापाऱ्याचे पैसे घेवून ते देण्यास टाळाटाळा करत असलेल्या नाशिकच्या व्यापाऱ्याविरूद्ध विशेष पोलिस महानिरीक्षक डॉ. प्रताप दिघावकर यांच्याकडे तक्रार आली होती. दिघावकरांनी त्यात लक्ष घालताच चोविस तासात नेपाळच्या व्यापाऱ्याला पैसे परत मिळाले. यानिमित्ताने पोलिस कणखर झाल्यास काय घडते याचा प्रत्यय आला. 

नेपाळचे कांदा व्यापारी राजाराम रेग्मी यांना स्वस्तात कांदा देण्याचे आमिष दाखवित निंबाळे (ता. चांदवड) येथील ग्रीबेल एक्सपोर्टचे संचालक राहूल चौधरी यांनी श्री. रेग्मी यांच्याकडून ऑनलाईन पद्धतीने सहा लाख ५० हजार रुपये मागवून घेतले. मात्र अनेक दिवस उलटूनही कांदा न मिळाल्याने श्री. रेग्मी यांनी विचारपूस केली असता चौधरी यांनी कांदा व साडेसहा लाख रुपये देण्यास टाळाटाळ केली. अखेर चौधरी यांनी रेग्मी यांना धनादेश दिले. मात्र ते धनादेशही वटले नाहीत.

कांदा व पैसे देण्यास चौधरी देण्यात यांच्याकडून टाळाटाळा झाल्याने आपली यात फसवणूक होत असल्याचे जाणीव श्री. रेग्मी यांना झाली. त्यांनी याबाबत नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरीक्षक दिघावकर यांच्याकडे धाव घेतली. श्री. दिघावकर यांच्या शीरस्त्याप्रमाणे त्यानी या प्रकरणाची माहिती घेतल्यानंतर लगेच सक्रीय होऊन कारवाईच्या सूचना दिल्या. नेपाळच्या कांदा व्यापाऱ्याच्या फसवणूकीविषयी लासलगाव पोलिस ठाण्यातील अधिकाऱ्यांना याबाबत चौकशी करण्याचे आदेश दिले.

पोलिस अधीक्षक सचिन पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक विश्‍वनाथ निमसे, राहूल वाघ, रामकृष्ण सोनवणे, आदिनाथ कोठाळे, प्रदीप आजगे, गणेश बागुन, सागर आरोटे यांनी या अर्जावर तत्काळ करवाई करताच राहूल चौधरी यांनी नेपाळ येथील कांदा व्यापारी राजाराम रेग्मी यांचे सहा लाख ५० हजार रुपये त्यांना परत दिले.
....
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com