आमदारांच्या नियुक्त्यांना विलंब विधिमंडळाचा अपमान !

राज्य सरकारने मंत्रीमंडळाच्या बैठकीत मंजुर केलेली विधान परि,द सदस्यांची यादी राज्यपालांना पाठवली आहे. त्या नियुक्त्यांना विलंब होणं हा विधीमंडळाचा अपमान आहे. त्या नियुक्त्या तातडीने झाल्या पाहिजे.
Sanjay Raut
Sanjay Raut

नाशिक : राज्य सरकारने मंत्रीमंडळाच्या बैठकीत मंजुर केलेली विधान परि,द सदस्यांची यादी राज्यपालांना पाठवली आहे. त्या नियुक्त्यांना विलंब होणं हा विधीमंडळाचा अपमान आहे. त्या नियुक्त्या तातडीने झाल्या पाहिजेत, असे शिवसेना नेते, खासदार संजय राऊत यांनी सांगितले.

भारतीय जनता पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष, माजी आमदार वसंत गिते व सुनिल बागूल यांचा शिवसेना प्रवेश निश्चित झाला आहे. यासंदर्भात झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. श्री. राऊत म्हणाले, वसंत गीते आणि सुनील बागुल दोघेही स्वगृही परतले आहेत. जुने शिवसैनिक पुन्हा परत येत आहेत. पक्षप्रमुखांची यांच्यासोबत वर्षा निवासस्थानी बैठक झाली. त्यांचा  प्रवेश नाशिकला होणं महत्वाचं होतं. यातुन नाशिक पुन्हा शिवसेनेचा बालेकिल्ला करण्याची जबाबदारी या दोघांवर आहे. त्यांच्या प्रेवशावर पक्षात कोणतेही मतभेद नाहीत. आजच सायंकाळी पक्षप्रमुखांकडून त्यांची पक्षातील जबाबदारी निश्चित होईल. नाशिक शहरात राजकीय प्रवाह बदलतोय. भाजपचे अनेक पदाधिकारी शिवसेनेच्या वाटेवर आहेत. काही भेटून गेले. लवकरच हे प्रवेश होतील. 

औरंगाबाद विमानतळाचे नाव बदलून छत्रपती संभाजी महाराज असे करण्याचा ठराव मंत्रीमंडळाने मंजूर करून केंद्राला पाठवला आहे. काँग्रेस पक्ष देखील मनातून संभाजीनगर नावाला सकारात्मक आहे. बिहारमधील औरंगाबाद जिल्ह्याचं नामांतर करावं अशी मागणी आहे. त्यावर भाजपनं भूमिका स्पष्ट करावी असेही त्यांनी म्हटले. 

ते म्हणाले, महाविकास आघाडीचा किमान समान कार्यक्रमात नामकरणाचा विषय नाही. मात्र याचा अर्थ लोकभावनेवर आधारीत देखील निर्णय घ्यायचे नाही असं होत नाही. माझ्यावर कोणताही घाव, वार, हल्ला याचा परिणाम होत नाही. मी कशाला घाबरत नाही. माझ्या दृष्टीने नोटिस म्हणजे सरकारी कागद. आमच्या मागे ईडी, सीबीआय लावणा-यांनी एक लक्षात ठेवावे, की आम्ही तलवार उपसली तर अनेकांना पळापळ करावी लागेल.  मी विरोधी पक्षांचा सन्मान राखतो. मात्र प्रताप सरनाईक यांना वेगळा न्याय आणी गिरीश महाजन यांना वेगळा का ? त्याचे उत्तर लोकांना समजले पाहिजे. दिल्लीच्या शेतकरी आंदोलनात शेतकऱ्यांचे मृत्यू झालेत, ते केंद्राने केलेले खून आहेत, असा आरोपही त्यानी यावेळी केला. 
....

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com