भाजपच्या कर्ज काढुन महापालिकेतील दिवाळीला आयुक्तांचा दणका

महापालिकेची आर्थिक स्थिती व कर्ज काढळ्यास हप्ते फेडण्याची क्षमता नाही, हे कारण देत महापालिका आयुक्त कैलास जाधव यांनी सत्ताधारी भाजपच्या कर्जाच्या प्रस्तावाला नकार दिला आहे.
Jadhav- Kulkarn
Jadhav- Kulkarn

नाशिक : महापालिकेची आर्थिक स्थिती व कर्ज काढळ्यास हप्ते फेडण्याची क्षमता नाही, हे कारण देत महापालिका आयुक्त कैलास जाधव यांनी सत्ताधारी भाजपच्या कर्जाच्या प्रस्तावाला नकार दिला आहे. त्यामुळे निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कर्ज काढून शहरात कामांची दिवाळी करण्याच्या भाजपच्या स्वप्नाला तडा गेला आहे. 

राज्यात महाविकास आघाडीचे सरकार आहे. त्यात महापौर सतीश कुलकर्णी सातत्याने शिवसेनेशी पंगा घेत आहेत. त्यामुळे महापालिका आयुक्तांनी दोनशे कोटींचे कर्ज काढण्याच्या भाजपच्या प्रस्तावाला होल्ट केले. त्यामुळे सत्ताधारी भाजप वरती राज्य सरकार व महापालिकेत आयुक्त यांच्या नकारघंटेच्या कात्रीत सापडले आहे. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर स्वपक्षाच्या नगरसेवकांना चुचकारण्याचा त्यांचा प्रयत्न फसला आहे.     

शहरात नव्याने होणारे दोन उड्डाणपूल रद्द करण्याबरोबरच नगरसेवकांना विकासकामे करण्यासाठी तीनशे कोटींचे कर्ज काढण्यासाठी आयुक्त कैलास जाधव यांच्याकडे सादर करण्यात आलेल्या प्रस्तावाला लेखी नकार देण्यात आल्याने सत्ताधारी भाजपला जोरदार दणका मिळाला आहे. दायित्वाचा भार एक हजार ६७० कोटी रुपयांपर्यंत पोचल्याने कर्जाचे हप्ते भरणे परवडणारे नसल्याचा दाखला आयुक्तांनी दिला.

पुढील वर्षात महापालिकेच्या निवडणुका होणार आहेत. त्यामुळे संपूर्ण वर्षभर विकासकामांचा बार उडवून मतदारासंमोर जाण्यासाठी सत्ताधारी भाजपने कर्ज काढण्याचा निर्णय घेतला होता. राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्याकडे तशी परवानगी मागितल्यानंतर प्रस्ताव सादर करण्यात आला; परंतु शिवसेनेने कर्ज काढण्यास जोरदार विरोध दर्शविला. त्यावरून भाजप व शिवसेनेत शाब्दिक चकमक उडाली. मंगळवारी (ता. १९) महासभेत कर्जाचा प्रस्ताव आणण्याची तयारी भाजपने केली होती; परंतु आयुक्त जाधव यांनी प्रस्तावाला लेखी नकार कळविला.

कर्जाची गरज नाही

कोरोनामुळे महापालिकेच्या उत्पन्नात मोठ्या प्रमाणात घट झाली आहे. साडेतीनशे कोटींनी उत्पन्न घटल्याने एक हजार ६७० कोटी रुपयांचे दायित्व पोचले आहे. यात मंजूर कामांबरोबरच अंदाजपत्रकात प्रस्तावित असलेली कामेदेखील पूर्ण होणार नसल्याने त्यात कर्ज काढून त्याच्या व्याजाचे हप्ते भरणे परवडणारे नाही. त्यामुळे कर्ज उभारणी करण्याची गरज नसल्याचे आयुक्त जाधव यांनी स्पष्ट केले.

नगरसेवकांच्या विकासकामांसाठी निधी नसल्याने कर्ज काढणे गरजेचे आहे. परंतु प्रशासन कोणाच्या तरी दबावाखाली काम करत असून, विकासकामांना जाणीवपूर्वक खोडा घालत आहे.
- सतीश कुलकर्णी, महापौर
....
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com