भाजप आमदार, नगरसेवकांच्या गटबाजीने विकास खुंटला !

देवेंद्र फडणवीस यांनी नाशिक दत्तक घेतले होते. राज्यात भाजपाची सत्ता असतानाही शहरात एकही महत्वकांक्षीप्रकल्प आला नाही. भाजपाचे तीन आमदार, 66 नगरसेवकांतील गटबाजीमुळे विकास खुंटला आहे.
Shivsena Sudhakar Badgujar
Shivsena Sudhakar Badgujar

नाशिक : शहरात शिवसेनेच्या शाखा विस्ताराचे काम जोमाने सुरू आहे. त्यामुळे शिवसेना कार्यकर्त्यांत चैतन्याचे वातावरण आहे. पक्षाचे सर्व कार्यकर्ते आगामी महापालिका निवडणुकीच्या तयारीला लागले आहेत. त्यामुळे यंदाच्या निवडणुकीत महापालिकेवर शिवसेनेचा भगवा निश्चितच फडकेल असा विश्वास शिवसेना महानगरप्रमुख सुधाकर बडगुजर यांनी व्यक्त केला.

श्री बडगुजर यांच्या उपस्थितीत सोमवारी पंचवटी भागात पक्षाच्या चार नवीन शाखांचे उद्घाटन झाले. त्यावेळी ते बोलत होते. महानगरप्रमुख पदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर बडगुजर यांनी पदाधिकारी, अंगीकृत संघटनांच्या नेत्यांची बैठक घेत शाखा उद्घाटनांचा धडाका लावला आहे. 

उद्घाटन प्रसंगी ते म्हणाले, भाजपचे तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भर सभेत नाशिक दत्तक घेऊ अशी घोषणा केली होती. राज्यात भाजपाची सत्ता असतानाही शहरात एकही महत्वकांक्षी प्रकल्प आला नाही. भाजपाचे शहरात तीन आमदार, 66 नगरसेवक असतानाही त्यांच्यातील गटबाजीमुळे विकास खुंटला आहे. त्यामुळेच लोक आता शिवसेनेकडे अपेक्षेने पहात आहेत. त्यासाठी शिवसेना कार्यकर्त्यांनी आत्तापासूनच जोमाने कामाला लागावे. 

ते पुढे म्हणाले, महापालिकेत शिवसेनेचे पुर्ण बहुमत आहे. सर्व पदांवर भाजपची मंडळी आहेत. शहरभर या पदांचा बड़ेजाव दाखवत ते फिरतात मात्र त्यांना शहराच्या समस्या व नागरिकांच्या अडचणी दिसत नाहीत. हे लोक सत्तेत राहण्यास योग्य नाहीत. शिवसेनेचे कार्यकर्ते, नगरसेवक व पदाधिकारी कोरोना काळात नागिरकांच्या सेवेसाठी धावपळ करीत होते. तेव्हा भाजपची मंडळी घरात बसुन होती. त्यामुळे समाजकारणावर भर देणारी शिवसेना निष्क्रीय भाजपला धडा शिकवेल.

यावेळी शिवसेना उपनेते बबनरावजी घोलप, खासदार हेमंत गोडसे, माजी महापौर विनायक पांडे, माजी जिल्हाप्रमुख दत्ताजी गायकवाड, युवा सेनेचे दीपक दातीर, भारतीय विद्यार्थी सेनेचे जिल्हाध्यक्ष वैभव ठाकरे, मंगलाताई भास्कर, देवानंद बिरारी, बाळासाहेब कोकणे, नितीन चिडे, दिगंबर मोगरे, राहुल दराडे आदी उपस्थित होते. 
...
Edited by Sampat Devgire

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com