थेट कोरोनाग्रस्तांची भेट घेऊन विचारपुस करणारे दादा भुसे ठरलेत पहिलेच मंत्री!

कृषीमंत्री दादा भुसे यांनी रविवारी रात्री पीपीई किट परिधान करीत थेट कोरोनाग्रस्तांच्या वॉर्डात गेले. त्यांनी या रुग्णांची विचारपुस केली. हे रुग्ण म्हणाले, व्यवस्थेत काही सुधारणा केल्या, तर अनेकांचे प्राण वाचतील. तुम्ही त्यात लक्ष घालाच.'
Dada Bhuse Visited Covid Hospitals to Take Stock of Situation
Dada Bhuse Visited Covid Hospitals to Take Stock of Situation

मालेगाव : शहरातील "कोरोना'चा वाढता संसर्ग लक्षात घेता, रुग्ण आणि आरोग्यसेवा कर्मचारी, प्रशासनाचे मनोबल उंचावण्यासाठी कृषीमंत्री दादा भुसे यांनी रविवारी रात्री पीपीई किट परिधान करीत थेट कोरोनाग्रस्तांच्या वॉर्डात गेले. त्यांनी या रुग्णांची विचारपुस केली. यावेळी हे रुग्ण म्हणाले, "तुम्ही खुप मोठी रिस्क घेतली. आम्हाला कोणीच विचारीत नाही. आपण विचारपुस करायला इथे आलात. मात्र व्यवस्थेत काही सुधारणा केल्या, तर अनेकांचे प्राण वाचतील. तुम्ही त्यात लक्ष घालाच.''

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर प्रशासनातर्फे विविध रुग्णांना क्वारंटाईन करण्यात आलेल्या येथील शहरातील फऱ्हान, जीवन आणि मन्सुरा या रुग्णालयात रविवारी रात्री कृषीमंत्री दादा भुसे व महापालिका आयुक्त त्र्यंबक कासार यांनी पीपीई किट परिधान करुन प्रत्यक्ष कोरोना बाधित रुग्णांची भेट घेतली. यावेळी विविध रुग्ण व कर्मचाऱ्यांशी त्यांनी संवाद साधला.

सोयीसुविधांची केली पाहणी

रूग्णांची आस्थेवाईकपणे विचारपुस करतांना सोयीसुविधांची पाहणी केली. यावेळी या रुग्णांनी भुसे यांचे कौतुक केले. ते म्हणाले, "गेले दहा दिवस आम्ही येथे क्वारंटाईंन आहोत. मात्र कोणीच विचारायला येत नाही. कोणीच इकडे फिरकत नाही. सुविधांची अडचण आहे. त्यावर मंत्री भुसे यांनी त्यात सुधारणा होतील. तुम्ही निश्‍चिंत रहा असा धीर दिला. त्यावर हे रुग्ण म्हणाले, "तुम्ही या सुधारणा केल्या तर अनेकांचे प्राण वाचतील.' 

रुग्णांमध्ये एकटेपणाची भावना येऊ नये म्हणून दिली भेट

शहरातील फऱ्हान हॉस्पिटलमध्ये महापालिकेने कोविड रुग्णालयाचे एक युनिट तयार केले आहे. येथे श्री. भुसे यांनी कोरोनाबाधित रुग्णांची भेट घेऊन संवाद साधला. विचारपूस केली. रुग्णांना मिळत असलेल्या सोयी सुविधा व उपचार याची खात्री करत रुग्णांना धीर दिला. यावेळी त्यांच्या समवेत आयुक्त त्र्यंबक कासार देखील होते. या रुग्णालयांमध्ये सुरक्षा आणि विषाणू प्रसारामुळे कोणालाही प्रवेश करण्यास जाण्यास मज्जाव आहे. आप्त, नातेवाईक देखील तीथे जाण्यास धजावत नाही.

त्यामुळे आजारपणाच्या काळात रुग्णांना आपल्या कुटुंबीयांनी भेट दिल्यास रुग्णांना मानसिक धीर मिळतो. अशा रुग्णांमध्ये एकटेपणाची भावना निर्माण होऊ नये, यासाठी श्री. भुसे व श्री. कासार यांनी आपलेपणाच्या भावनेतून त्यांची भेट घेतली. येथे आरोग्यसेवा देणाऱ्यांनाही प्रोत्साहन मिळाले. थेट कोरोनाग्रस्त रुग्णांची भेट घेऊन संवाद साधनारे श्री. भुसे हे राज्यातील पहिलेच मंत्री म्हणता येतील. 
... 
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com