सोलापूरकरांनो, राज्याचा उपमुख्यमंत्री या नात्याने मी तुम्हाला शब्द देतो....

हा विषय काहीजणांकडून राजकीय फायदा घेण्याच्या दृष्टीकोनातून तापवण्याचे काम चाललेले आहे.
Ujani Dam water issue will not allow injustice to happen to Solapur district : Ajit Pawar
Ujani Dam water issue will not allow injustice to happen to Solapur district : Ajit Pawar

पुणे : ‘‘उजनी धरणाच्या (Ujani Dam) पाणीप्रश्नी सोलापूर जिल्हा (Solapur district), तेथील शेतकरी आणि लोकप्रतिनिधींनी कोणताही गैरसमज करून घेऊ नये. कुठलीही अन्यायकारक भूमिका सरकारमधून होणार नाही. त्याबाबतचा शब्द राज्याच्या उपमुख्यमंत्री (Deputy Chief Minister) या नात्याने मी स्वतः तुम्हाला देतो. जोपर्यंत आम्ही सरकारमध्ये आहोत, तोपर्यंत कोणावर अन्याय होऊ देणार नाही,’’ अशा शब्दांत उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी सोलापूकरांना याबाबत अश्वस्त केले. (Ujani Dam water issue will not allow injustice to happen to Solapur district : Ajit Pawar)

उजनी धरणाचे पाच टीएमसी पाणी इंदापूरला देण्याच्या निर्णयावरून सोलापूर जिल्ह्यात तीव्र पडसाद उमटले आहेत. त्याविरोधात सोलापूर जिल्ह्यातून विरोध वाढत आहेत. त्या पार्श्वभूमीवर पुण्यात बोलताना अजित पवार यांनी वरील भूमिका मांडली.

उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले की, कारण नसताना त्या प्रश्नाला फोडणी देण्याचे काम चालेले आहे. मला त्याबद्दल एवढंच म्हणायचं आहे की राज्य चालवत असताना त्या पाण्यावर ज्यांचा अधिकार आहे. त्यांचे पाणी कोणीही काढून घेणार नाही. ज्यावेळी एका धरणाचे काम हाती घेतले जाते, त्याचवेळी पाण्याचे नियोजन केले जाते. त्यानंतरच्या काळात नागरीकरण वाढलं, पाण्याचा वापर वाढला, तर त्यासंदर्भात सर्वांना विश्वासात घेऊन पुढील कार्यवाही केली जाते.

इंदापूर तालुक्यातील लाकडी-निंबोडी पाणी योजनेची चर्चा गेल्या २० ते २५ वर्षांपासून सुरू आहे. त्या योजनेला एवढं पाणी लागतच नाही. कारण नसताना पाच टीमसी आणि सहा टीएमसी पाणी अशी चर्चा केली जात आहे. मी यानिमित्ताने सोलापूर जिल्ह्याला, तेथील शेतकरी आणि लोकप्रतिनिधींना आवाहन करू इच्छितो की यामध्ये तुम्ही काहीही गैरसमज करून घेऊ नये. कुठलीही अन्यायकारक भूमिका सरकार घेणार नाही. त्याबाबतचा शब्द राज्याच्या उपमुख्यमंत्री या नात्याने मी स्वतः देतो, असे पवार यांनी नमूद केले. 


उजनीच्या पाण्याबाबत नुसतं तसं सांगण्यापेक्षा त्याबाबतची करेक्ट भूमिका घेतलेली दिसेल. या प्रश्नी सर्वांना न्यायालयात जाण्याचा अधिकार आहे. लोकशाहीत तो काढून घेण्याचा काहीही कारण नाही. पण, वस्तुस्थिती काय आहे, हे इंदापूरकर आणि सोलापूरकरांनीही समजून घ्यावी. पण, हा विषय काहीजणांकडून राजकीय फायदा घेण्याच्या दृष्टीकोनातून तापवण्याचे काम चाललेले आहे. त्याला कोणी महत्व देऊ नये. कारण, तो कोणावर अन्याय नाही आहे. जोपर्यंत आम्ही सरकारमध्ये आहोत, तोपर्यंत आम्हीदेखील कोणावर अन्याय होऊ देणार नाही, असाही शब्द उमुख्यमंत्र्यांनी दिला.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com