जगातील सर्वात मोठ्या कुटूंबाच्या प्रमुखाचे निधन; 39 बायका, 94 मुलं अन् 33 नातवंडांचं कुटूंब - Ziona Chana head of worlds largest family dies in Mizoram | Politics Marathi News - Sarkarnama

जगातील सर्वात मोठ्या कुटूंबाच्या प्रमुखाचे निधन; 39 बायका, 94 मुलं अन् 33 नातवंडांचं कुटूंब

वृत्तसंस्था
रविवार, 13 जून 2021

मिझोरमचे मुख्यमंत्री जोरथथांगा यांनी ट्विटरवरून चाना यांच्या निधनाची माहिती दिली.

नवी दिल्ली : जगातील सर्वात मोठ्या कुटूंबाचे प्रमुख म्हणून ओळख असलेल्या 76 वर्षीय जिओना चाना यांचे रविवारी निधन झाले. त्यांना 39 पत्नी, 94 मुंल आणि 33 नातवंडं आहेत. एवढ्या मोठ्या कुटूंबामुळं मिझोरममधील हे ठिकाण पर्यटकांचे आकर्षणाचे केंद्र बनले आहे. (Ziona Chana head of worlds largest family dies in Mizoram)

मिझोरमचे मुख्यमंत्री जोरथथांगा यांनी ट्विटरवरून चाना यांच्या निधनाची माहिती दिली. 'मिझोरम आणि बकटावंग तलंगनुम मधील जिओना चाना यांचे गाव त्यांच्या कुटूंबामुळं पर्यटनाचे प्रमुख आकर्षण बनले होते, ' असंही त्यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे. 

हेही वाचा : आमदार महेश लांडगेंना महिन्यात दुसरा धक्का; भाजप कार्यकर्त्यांचा शिवसेनेत प्रवेश

जिओना चाना यांच्या कुटूंबातील बहुतेक महिला शेती करत घर चालविण्यासाठी मदत करतात. त्यांची पहिली पत्नी आता कुटूंबाची प्रमुख म्हणून काम करते. घरातील प्रत्येकाला काम सोपविणे, कामावर नजर ठेवण्याचे जबाबदारी त्यांच्यावर आहे. सध्या त्यांचे घर चार मजली असून घरामध्ये तब्बल 100 खोल्या असून ते सर्वजण एकत्रच राहतात. त्यामुळे हे कुटूंब पर्यटकांचे आकर्षण ठरते.

चाना यांची मुलं, सुना व नातवंडे याच इमारतीत राहतात. प्रत्येक मुलाच्या कुटूंबाला स्वतंत्र खोली आहे. मात्र, एकाच स्वयंपाक खोली सर्वांसाठी जेवण बनविले जाते. चाना यांचा जन्म 21 जुलै 1945 रोजी झाला होता. त्यांचे वय 17 असताना त्यांच्यापेक्षा तीन वर्षांनी लहान असलेल्या मुलीशी त्यांचा पहिला विवाह झाला. 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख