सेक्स स्कँडल भोवले : 71 वर्षीय नेत्याला द्यावा लागला उपाध्यक्षपदाचा राजीनामा

महिलांशी झालेल्या संवादाच्या अॉडिओ क्लिप मागील महिन्यातबाहेर आल्यानंतर एकच खळबळ उडाली आहे.
Zimbabwes Vice president resigns amid sexual misconduct allegations
Zimbabwes Vice president resigns amid sexual misconduct allegations

हरारे : सेक्स स्कँडलमध्ये अडकलेले झिम्बाब्वेचे 71 वर्षीय उपाध्यक्ष केंबो मोहादी यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. दक्षिण आफ्रिकन देशांमध्ये अशाप्रकारे राजीनामा द्यावा लागण्याची ही दुर्मिळ घटना असल्याचा दावा तेथील माध्यमांनी केला आहे. मागील महिन्यात एका अॉनलाईन पोर्टलने केंबो यांच्या मोबाईलमधील आक्षेपार्ह अॉडिओ क्लीप सार्वजनिक केल्या होत्या. 

केंबो मोहादी यांच्या महिलांशी झालेल्या संवादाच्या अॉडिओ क्लिप मागील महिन्यात बाहेर आल्यानंतर झिम्बाब्वेमध्ये एकच खळबळ उडाली आहे. या सेक्स स्कँडलवरून विरोधकांनी त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली होती. मोहादी यांनी मात्र आपल्यावर झालेले आरोप फेटाळून लावले आहेत. 

क्लिपमध्ये आपला आवाज नसल्याचे मोहादी यांचे म्हणणे आहे. आपल्याविरोधात राजकीय षडयंत्र रचल्याचा आरोप त्यांनी केला आहे. राजीनामा देताना मोहादी यांनी आपल्यावरील आरोप चुकीचे असल्याचा पुनर्रुच्चार केला. तसेच अध्यक्षांच्या कार्यालयाची प्रतिष्ठा जपण्यासाठी आपण राजीनामा देत असल्याचे त्यांनी जाहीर केले आहे.  

दरम्यान, समोर आलेल्या एका अॉडिओ क्लिपमध्ये एक पुरूष आपल्या कार्यालयामध्ये सेक्स करण्याबाबत बोलत असल्याचे समोर आले आहे. एका अॉडिओ क्लिपमध्ये ते त्यांच्याच कार्यालयातील विवाहित महिला अधिकाऱ्याशी बोलत असल्याचा दावा करण्यात आला आहे. 

मोहादी हे 2019 मध्येही वादात सापडले होते. संपत्तीच्या वादातून त्यांनी त्यांच्या पत्नीवर कुऱ्हाडीने वार करण्याची धमकी दिली होती. ते माजी सैनिक असून त्यांनी देशाच्या मुक्तीसंग्रामामध्ये भाग घेतला होता. मोहादी यांनी आपल्यावर झालेल्या आरोपाचे खंडन केले आहे.

आरोप फेटाळताना मोहादी म्हणाले, ''मी निर्दोष आहे. राजकीय षडयंत्रामध्ये मला अडकविले जात आहे. माझा आवाज क्लोन करण्यात आला आहे. माझे आरोप केवळ चुकीचेच नाहीत तर माझी राष्ट्रीय नेता ही प्रतिमा मलिन करण्यासाठी रचलेले पूर्वनियोजित षडयंत्र आहे.''

Edited By Rajanand More

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com