तुम्ही टायगर पण, तुमच्या वडिलांसोबत मी सिंहाची शिकार केली आहे 

माजी केंद्रीय मंत्री, भारतीय जनता पक्षाचे नवनिर्वाचित राज्यसभा सदस्य ज्योतिरादित्य शिंदे यांच्या "टायगर अभी जिंदा है' या विधानावर कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते दिग्विजय सिंह यांनी शुक्रवारी(ता. 3 जुलै) जोरदार हल्ला चढवला.
You are a tiger, but I have hunted lions with your father
You are a tiger, but I have hunted lions with your father

भोपाळ : माजी केंद्रीय मंत्री, भारतीय जनता पक्षाचे नवनिर्वाचित राज्यसभा सदस्य ज्योतिरादित्य शिंदे यांच्या "टायगर अभी जिंदा है' या विधानावर कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते दिग्विजय सिंह यांनी शुक्रवारी (ता. 3 जुलै) जोरदार हल्ला चढवला.

ते म्हणाले की,"एका जंगलात फक्त एकच सिंह राहू शकतो.' राज्यसभेचे सदस्य दिग्विजय सिंह यांनी भूतकाळाची आठवण करून देताना म्हटले आहे की "जेव्हा सिंहाची शिकार करण्यास बंदी नव्हती, तेव्हा ज्योतिरादित्य शिंदे यांचे वडील श्रीमंत माधवराव शिंदे यांच्यासमवेत मी सिंहांची शिकार केली आहे.' 

ज्योतिरादित्य शिंदे यांच्या भाजप प्रवेशानंतर मध्य प्रदेशमधील कॉंग्रेसचे कमलनाथ यांचे सरकार जाऊन भाजपचे शिवराज सिंह चौहान यांचे सरकार सत्तेवर आले आहे. शिंदे यांच्याबरोबर मार्चमध्ये भाजपमध्ये आलेल्या त्यांच्या समर्थक आमदारांना भाजपने मंत्रिमंडळ विस्तारात मोठ्या संख्येने संधी दिली आहे. या मंत्रिमंडळ विस्तारानंतर दिग्विजय सिंह यांनी ज्योतिरादित्य यांच्यावर जोरदार टीका केली आहे. 

तत्पूर्वी मंत्रिमंडळ विस्तारानंतर माध्यमांशी बोलताना ज्योतिरादित्य शिंदे यांनी कॉंग्रेस पक्ष विशेषतः माजी मुख्यमंत्री कमलनाथ आणि दिग्विजय सिंह यांच्यावर जोरदार टीका केली होती. कॉंग्रेस पक्षाकडून माझी आणि माझ्या समर्थकांची प्रतिमा मलिन करण्याचा प्रयत्न होत आहे, असा आरोप शिंदे यांनी केला होता. याबाबत कॉंग्रेसला मी सविस्तर उत्तर देईन. विशेष करून माजी मुख्यमंत्री कमलनाथ आणि दिग्विजय सिंह यांना आता एवढेच सांगतो की, "टायगर अभी जिंदा है.' 

ज्योतिरादित्य शिंदे यांच्या या टिकेला उत्तर देताना माजी मुख्यमंत्री दिग्विजय सिंह यांनी म्हटले आहे की "वेळ मोठी ताकदवान असते. भारतीय जनता पक्षाचे भविष्य. या मंत्रिमंडळ विस्ताराने भाजपचे किती सिंह जागे केले आहेत, ते फक्त बघत राहा, असा इशारा त्यांनी दिला आहे. 

खासदार दिग्विजय सिंह यांनी पुढे म्हटले आहे की, "सिंहाचे खरे जीवन आपल्याला माहिती आहे का? एका जंगलात फक्त एकच सिंह राहू शकतो.' 

राज्यसभा सदस्य दिग्विजय सिंह यांनी दुसऱ्या एका ट्विटमध्ये ज्योतिरादित्य शिंदे यांच्यावर टीका करताना म्हटले आहे की, शिकारीला जेव्हा बंदी नव्हती, त्या वेळी मी आणि श्रीमंत माधवराव शिंदे सिंहाची शिकार करत होतो. इंदिरा गांधी यांनी वन्यजीव संरक्षण कायदा आणल्यापासून मी सिंहाला फक्त कॅमेऱ्यात बंदिस्त करीत आहे. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com