गुड न्यूज : १८ वर्षावरील सर्वांना मोफत कोरोना लस...  - yogi governments provide free vaccination to all persons above 18 years | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

राजीव सातव यांच्या पार्थिवावर सोमवारी (ता. 17 मे) रोजी सकाळी दहा वाजता कळमनुरी (जि. हिंगोली) येथे अंत्यसंस्कार होणार.
राजीव सातव यांचे कोरोनाने निधन

गुड न्यूज : १८ वर्षावरील सर्वांना मोफत कोरोना लस... 

वृत्तसंस्था
बुधवार, 21 एप्रिल 2021

''कोरोना हरेल आणि भारत जिंकेल,'' असे टि्वट योगी आदित्यनाथ यांनी केले आहे.

अलाहाबाद : केंद्र सरकारने १८ वर्षावरील सर्वांना कोरोना लसीकरणास ता. १ मे पासून परवानगी दिली आहे. उत्तर प्रदेश मंत्रीमंडळाने १८ वर्षांवरील सर्वांना कोरोना लस मोफत देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रीमंडळाच्या बैठकीत हा महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आला. 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी १८ वर्षावरील सर्वांना कोरोना लसीकरणास परवानगी दिल्याबाबत योगी आदित्यनाथ यांनी मोदींचे आभार मानले.  उत्तर प्रदेशामध्ये कोरोना रोखण्यासाठी १८ वर्षांवरील सर्वांना मोफत लस देण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे योगी आदित्यनाथ यांनी सोशल मीडियावरून सांगितले. 

''मंत्रिमंडळ बैठकीत उत्तर प्रदेशातील १८ वर्षाच्या पुढील सर्वांना कोरोना लस मोफत देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. कोरोना हरेल आणि भारत जिंकेल,'' असे टि्वट योगी आदित्यनाथ यांनी केले आहे.  योगी आदित्यनाथ कोरोना पॉझिटिव्ह आढळले असून ते सध्या विलगीकरणात आहेत. सोशल मीडियाच्या माध्यमातून ते मंत्रीमंडळाच्या बैठकीस उपस्थित होते. उत्तर प्रदेशमध्ये वीकेण्ड लॉकडाउनची घोषणा करण्यात आली आहे. सोमवारी सकाळी ७ वाजेपर्यंत हा लॉकडाउन असणार आहे. नाईट कर्फ्यू जाहीर करण्यात आला आहे. अत्यावश्यक सेवा वगळता इतर गोष्टींना परवानगी नसणार आहे.
 
सध्या  देशात 1एप्रिलपासून 45 वर्षांवरील सर्व नागरिकांना ही लस दिली जात आहे. सरकारी रुग्णालयात ही लस मोफत देण्यात येत आहे. खासगी रुग्णालयात यासाठी 250 रुपये मोजावे लागत होते. सरकारने आता ही किंमत कमी करुन 200 रुपयांवर आणली आहे. जगातील सर्वात मोठ्या कोरोना लसीकरणास भारतात 16 जानेवारीला सुरवात झाली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या मोहिमेचे उद्घाटन करण्यात आले होते. सरकारने लस देण्याचा प्राधान्यक्रम ठरवला आहे.  

देशात कोव्हिशिल्ड आणि कोव्हॅक्सिन या दोन लशींचा वापर लसीकरणासाठी होत आहे. आता केंद्र सरकारने रशियाच्या स्पुटनिक व्ही या लशीच्या आपत्कालीन वापरास परवानगी दिली आहे. स्पुटनिकचे उत्पादन डॉ.रेड्डीज ही कंपनी करीत आहे. सिरम इन्स्टिट्यूट ही कोव्हिशिल्ड या कोरोना लशीचे उत्पादन करीत आहे. ही लस ऑक्सफोर्ड युनिव्हर्सिटी आणि अॅस्ट्राझेन्का यांनी विकसित केली आहे. दुसरी लस ही भारत बायोटेकची कोव्हॅक्सिन ही आहे.  
Edited by: Mangesh Mahale 
 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख