X-ray will tell if Corona is there or not ... also free .. | Sarkarnama

एक्सरेतून कळणार कोरोना आहे की नाही...तेही मोफत..  

सागर आव्हाड 
शनिवार, 1 ऑगस्ट 2020

संरक्षण विभागाच्या डीआएटी या संस्थेने आता छातीच्या एक्सरेतून कोरोना आहे की नाही, याचे तंत्र विकसित केल आहे. ते ही विनाशुल्क
.

पुणे : खडकवासला येथील संरक्षण विभागाच्या डीआएटी या संस्थेने आता छातीच्या एक्सरेतून कोरोना आहे की नाही याचे तंत्र विकसित केल आहे. ते ही विनाशुल्क.

कोरोना आहे की नाही याकरता सध्या स्वाँब टेस्ट घेतली जाते .शासकीय संस्थामध्ये ही चाचणी मोफत केली जाते. खासगी हाँस्पिटलमध्ये याला तीन हजार रुपयांपर्यंत शुल्क आकारले जाते. कोरोनाचा विषाणू हा नाकावाटे शरीरात जातो आणि त्यानतंर तो ह्रुदयावर मारा करण्यास सुरवात करतो. प्रसंगी यात रुग्णांचा मृत्युही होतो. स्बाँव टेस्ट सोबत आता रुग्णांना छातीचा एक्समधूनही कोरोनाचा  संसर्ग झाला की नाही हे पाहता येणार आहे.
 
डीआयएटीच्या वेबसाईटच्या माध्यमातुन.संशोधक सुनिता ढवळे यांनी हे तंत्र विकसित केले आहे. पुण्यासह दिल्लीतील डीआरडीओच्या वल्लभभाई पटेल हाँस्पिटल मधील रुग्णांचा एक्सरे तपासण्यात आले. रुग्णांनी आपला एक्सरे काढल्यानतंर  diat.ac.in या वेबसाईटला गेल्यानतंर तिथे लाल रंगात मुख्य पेजवर एनेबलड कोवीड 19 या आँप्शल गेल्यानतंर आपला तिथे एक्सरे अपलोड करायचा आहे. साधारपणे काही सेकंदात रुग्णाला कोरोना आहे का की नाही हे लगेच कळते. तसेच काही संशय असल्यास तशी पुढील सुचनाही रुग्णाला दिल्या जातात. याकरता कोणतेही संस्था शुल्क आकारत नाही, डीआयएटीचे कुलगुरू सी.पी रामनारायणन यांनी हि माहिती दिली. 

पुणे शहर, पिंपरी चिंचवड आणि ग्रामीण भागात मिळून जिल्ह्यात शुक्रवारी दिवसभरात तीन हजार ९४ नवे रुग्ण सापडले आहेत. एकाच दिवसात नव्या रुग्णांचा तब्बल तीन हजारांचा आकडा ओलांडण्याची (ता.३१) चौथी वेळ आहे. याआधी २२ जुलैला तीन हजार २१८, त्यानंतर २८ जुलैला तीन हजार ४४ तर, ३० जुलैला ३ हजार ६५८ नवे रुग्ण सापडले होते. शुक्रवारी पुन्हा तीन हजार ९४ रुग्ण आढळले.

दिवसभरातील एकूण रुग्णांमध्ये पुणे शहरातील एक हजार ८८०, पिंपरी चिंचवडमधील ८८३, जिल्हा परिषद कार्यक्षेत्रातील २३२ आणि नगरपालिका व कॅंंटोन्मेंट बोर्डातील मिळून ९९ रुग्णांचा समावेश आहे. (ता. ३०) रात्री ९ वाजल्यापासून (ता. ३१) रात्री नऊ वाजेपर्यंतची ही आकडेवारी आहे.

यामुळे जिल्ह्यातील एकूण रुग्णांची संख्या ८४ हजार ७६५ झाली आहे. याशिवाय आतापर्यंत १ हजार ९८१ मृत्यू झाले आहेत. शुक्रवारी दिवसभरात ५९ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये पुणे शहरातील सर्वाधिक २८ जण आहेत. याशिवाय पिंपरी चिंचवडमधील १२,  जिल्हा परिषद कार्यक्षेत्रातील १४ आणि नगरपालिका व कॅंंटोन्मेंट बोर्डातील मिळून ५ जणांचा समावेश आहे.
Edited  by : Mangesh Mahale  

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख