WHO चे प्रमुख  टेडरोस अदनोम घेबियस होम क्वारंटाइन  - World Health Organization Head Tedros Adnom Ghebius Home Quarantine | Politics Marathi News - Sarkarnama

WHO चे प्रमुख  टेडरोस अदनोम घेबियस होम क्वारंटाइन 

सरकारनामा ब्युरो
सोमवार, 2 नोव्हेंबर 2020

जागतिक आरोग्य संघटनेचे प्रमुख टेडरोस अदनोम घेबियस यांनी होम क्वारंटाइन होण्याचा निर्णय घेतला आहे. याबाबत टेडरोस यांनी टि्वट करून ही माहिती दिली आहे. 

नवी दिल्ली : जगभरात कोरोनाबाधितांची संख्या सातत्याने वाढत आहे. गेल्या काही दिवसात संपर्कात आलेल्या एका व्यक्तीचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आल्याने जागतिक आरोग्य संघटनेचे प्रमुख टेडरोस अदनोम घेबियस यांनी होम क्वारंटाइन होण्याचा निर्णय घेतला आहे. याबाबत टेडरोस यांनी टि्वट करून ही माहिती दिली आहे. 

टेडरोस अदनोम घेबियस हे सध्या पूर्णपणे स्वस्थ आहेत. परंतु जागतिक आरोग्य संघटनेच्या प्रोटोकॉलप्रमाणे ते घरुनच काम करणार आहेत. टेडरोस आपल्या टि्वटमध्ये म्हणतात की  मी करोनाबाधित व्यक्तीच्या संपर्कात आल्याचे दिसून आले आहे. सध्या मी पूर्णपणे स्वस्थ आहे व माझ्या कोणतीही लक्षणं नाहीत. परंतु, जागतिक आरोग्य संघटनेच्या नियमांप्रमाणे मी पुढील काही दिवसांसाठी होम क्वारंटाइनमध्ये असणार आहे व घरूनच काम करणार आहे.  क्वारन्टाईन होऊन कोरोनाची चैन तोडता येईल. ज्यामुळे आपण कोरोनाला हरवू शकतो.

जगभरात एकूण बाधितांची संख्या 4,68,04,423 इतकी झाली आहे. यापैकी 12,05,044 लोकांना त्यांचा जीव गमवावा लागला आहे. तर 3,37,42,731 लोकांनी कोरोनावर मात केली आहे. कोरोनाबाधितांच्या संख्येच्या बाबतीत भारत जगात दुसऱ्या स्थानावर आहे. सध्या देशात 5,63,775 अॅक्टिव्ह कोरोनाबाधित रुग्ण आहेत. भारतात आतापर्यंत 82,29,322 कोरोनाबाधितांची नोंद करण्यात आली आहे. यापैकी 1,22,642 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर 75,42,905 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. 

संबंधित लेख