हाॅलिवूड रिहानाने दिला शेतकरी आंदोलनाला पाठिंबा - World famous singer Rihanna supports the farmers movement | Politics Marathi News - Sarkarnama

हाॅलिवूड रिहानाने दिला शेतकरी आंदोलनाला पाठिंबा

सरकारनामा ब्यूरो
बुधवार, 3 फेब्रुवारी 2021

सुरुवातीपासूनच दिल्लीतील शेतकरी आंदोलनाला मोठा प्रतिसाद मिळत आहे. पंजाबी गायक, अभिनेते यांनी या आंदोलनालाच्या समर्थनार्थ सहभाग घेतला होता. आता हाॅलिवूडची प्रसिद्ध गायक रिहाना हिनेही शेतकऱ्यांच्या आंदोलनासंदर्भात एक ट्विट केलंय.  

नवी दिल्ली : कृषी कायद्यांविरोधात दिल्लीच्या वेशीवर गेल्या दोन महिन्यांपासून शेतकऱ्यांचे आंदोलन सुरु आहे. एकीकडे शेतकरी मागे हटण्यास तयार नाहीत, तर दुसर्या बाजूला सरकारही आपल्या भूमिकेवर ठाम आहे. याच पार्श्वभुमीवर दिल्लीतील सुरक्षा व्यवस्थाही मोठ्या प्रमाणात वाढविण्यात आली आहे. सुरुवातीपासूनच दिल्लीतील शेतकरी आंदोलनाला मोठा प्रतिसाद मिळत आहे. पंजाबी गायक, अभिनेते यांनी या आंदोलनालाच्या समर्थनार्थ सहभाग घेतला होता. आता हाॅलिवूडची प्रसिद्ध गायक रिहाना हिनेही शेतकऱ्यांच्या आंदोलनासंदर्भात एक ट्विट केलंय.  

दिल्लीच्या सीमेवर आंदोलन करत असलेल्या शेतकऱ्यांचा आवाज आता जगभर पसरत आहे. याच शेतकऱ्यांचा आवाज आता प्रसिद्ध सिंगर आणि परफाॅर्मर रिहानापर्यंतही पोहचला आहे. रिहानाने शेतकऱ्यांच्या समर्थनार्थ ट्विट केले. रिहानाने ट्विटरवर एक न्यूज शेअर केली आहे. यात आंदोलनामुळे बंद केलेल्या इंटरनेट सुविधेचाही उल्लेख आहे. यात, शेतकरी आंदोलनामुळे हरियाणातील अनेक जिल्ह्यांत कशा प्रकारे इंटरनेट सेवा बंद करण्यात आली, हेही सांगितले आहे. 

रिहानाने या न्यूज बरोबर कॅप्शनमध्ये लिलिले आहे. ''यासंदर्भात आपण चर्चा का करत नाही आहोत''  #FarmersProtest, रिहानाच्या ट्विटनंतर शेतकरी आंदोलनाची जगभर चर्चा होत, असल्याचं दिसून येत आहे. मात्र, रिहानाच्या ट्विटनंतर आता तिच्या फाॅलोवर्सचीदेखील चर्चा रंगली आहे. रिहाना बारबडीयन गायिका असून अभिनेत्री व उद्योजकही आहे. रिहना ही ३२ वर्षांची अशून २१ व्या शतकातील जगातील टाॅप गायिका आहे. 

ग्रेटा थनबर्गनेही केले समर्थन

रिहानानंतर आता स्वडिश पर्यावरण कार्यकर्ता ग्रेटा थनबर्ग यांनीही शेतकर्यांच्या समर्थनार्थ ट्विट केले आहे. आम्ही भारतातील शेतकर्यांच्या आंदोलनाच्या पाठीशी एकजुटीने उभे आहोत, असे त्यांनी म्हटले आहे. 

प्रजासत्ताक दिनी शेतकऱ्यांनी काढलेल्या ट्रॅक्टर रॅलीला हिंसक वळण लागले होते. त्या घटनेनंतर सरकारही आंदोलकांचा कठोरपणे सामना करण्याची तयारी करत आहे. ६ फेब्रुवारी रोजी आंदोलकांनी चक्का जामचा इशारा दिला आहे. या पार्श्वभुमीवर दिल्लीच्या सीमांवर शेतकऱ्यांना रोखण्यासाठी पोलिसांनी बॅरिकेडिंग आणि रस्त्यावर खिळे ठोकण्याबरोबर पाच प्रकारची सुरक्षा व्यवस्था तयार केली आहे. 

Edited By - Amol Jaybhaye 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख