re.jpg
re.jpg

संसदेतील 52 वर्षांचा ऋणानुबंध अखेर संपुष्टात..  

रेल्वे व संसदेच्या उपहारगृहांचा 52 वर्षांचा ऋणानुबंध अखेर संपुष्टात आला आहे. याबाबत गेले वर्षभर चर्चा सुरू होती.

नवी दिल्ली : संसदेचे उपहारगृह चालविण्याची जबाबदारी रेल्वेकडून अधिकृतरीत्या काढून घेण्यात आल्याचे आदेश काल देण्यात आले. आता संसदेच्या उपहारगृहांचे काम भारतीय पर्यटन विकास महामंडळ म्हणजेच आयटीडीसीकडे असेल. यामुळे रेल्वे व संसदेच्या उपहारगृहांचा 52 वर्षांचा ऋणानुबंध अखेर संपुष्टात आला आहे. याबाबत गेले वर्षभर चर्चा सुरू होती. 

लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी उत्तर रेल्वेला संसदीय उपहारगृहांतील सेवा थांबविण्याचे अधिकृत आदेश दिले आहेत. केंद्राच्याच अशोका ग्रुप ऑफ हॉटेल्स या पंचतारांकित हॉटेल साखळ्यांच्या उद्योगाचा आयटीडीसी हा एक भाग आहे. यामुळे 15 नोव्हेंबरपर्यंत रेल्वेला येथून गाशा गुंडाळावा लागेल व त्यानंतर आयटीडीसी संसद परिसरातील (मुख्य संसद भवन, संसदीय ग्रंथालय व विस्तारित कक्ष (ऍनेक्‍स) 8 उपहारगृहांच्या संचालनाची जबाबदारी घेईल. 

संसदीय उपहारगृहांतील खाद्यपदाथर्आंचे स्वस्त दर नेहमीच चर्चेचा विषय ठरला होता. या उपहारगृहांमध्ये प्रत्यक्ष खासदार फारच कमी जेवण-नाश्‍ता घेतात व त्यांची सारी सेवा मुख्यत्वे संसदेतील कर्मचारी- सुरक्षा कर्मचारीच घेतात असे निरीक्षण संसदीय समितीनेही नोंदविले होते. 1968 पासून उत्तर रेल्वेकडे या संसदीय उपहारगृहे चालविण्याची जबाबदारी होती. 2014 मध्ये मोदी सरकार आल्यावर संसदीय उपहारगृहांच्या या स्वस्तातील स्वस्त दरपत्रकात व रचनेतही बदल करण्याच्या हालचाली सुरू झाल्या. त्याचबरोबर ही सेवा रेल्वेकडून काढून घेण्यासाठीही सरकारने चाचपणी सुरू केली. बिर्ला व सासंकृतिक मंत्री प्रल्हाद पटेल यांच्यात याबाबत अनेक बैठका झाल्या. रेल्वेऐवजी राजस्थान-गुजरातेतील एकाद्या बड्या खासगी कंपनीकडे संसदीय उपहारगृहांची जबाबदारी देण्यात येईल अशीही चर्चा होती. प्रत्यक्षात सरकारने आयटीडीसीकडे याबाबतची जबाबदारी दिली आहे. 

पावसाळी अधिवेशनापासूनच संसदेतील उपहारगृहांत चहा कॉफी व्यतिरिक्त कोणताही पदार्थ शिजवण्यास मनाई होती. त्यामुळे संसदेत काम करणाऱ्या किमान 2000 कर्मचाऱ्यांपैकी बहुतेकांनी गेले वर्षभर घरूनच डबे आणण्यास सुरवात केली होती. आता तर या संसदीय कर्मचाऱ्यांना, जेवणानंतर तुमचे डबे संसदेतील स्वच्छतागृहांमध्ये धुवू नका, असे नवीन फर्मान काढण्यात आले आहे.


हेही वाचा :   चिराग पासवान यांचे 'हे' आहेत रणनीतीकार  

नवी दिल्ली : बिहार विधानसभा निवडणुकीत नितीशकुमार यांच्यावर सडकून टीका करणारे लोकजनशक्ती पक्षाचे नवे नेते खासदार चिराग पासवान यांची प्रचार रणनीती आखण्यात प्रशांत किशोर यांची पडद्यामागून मोठी भूमिका असल्याची माहिती मिळते. 

निकालापूर्वी पासवान यांना उघड पाठिंबा देणे परवडणारे नसल्याने किशोर यांच्या मार्फत चिराग यांची प्रचार मोहीम आखून देण्याची चाल खेळण्यात आल्याची चर्चा आहे. प्रशांत किशोर निवडणूक रणनीतीकार म्हणून मोठी प्रसिध्दी गुजरात व नरेंद्र मोदी यांच्यामुळे मिळाली.प्रशांत किशोर हेही मूळचे बिहारी आहेत. बिहारमध्ये ते जाहीरपणे कोठेही रिंगणात नाहीत. "मोदी तुझसे बैर नही, नितीश तेरी खैर नही' या भूमिकेतून उतरलेल्या चिराग यांना कौशल्याने पुढे करून भाजपने नितीशकुमार यांच्या जदयूची स्थिती "सहन होत नाही व सांगताही येत नाही', अशी करून ठेवली आहे. चिराग यांनी तब्बल 12 ते 13 भाजप बंडखोरांना रातोरात तिकीटवाटप केले. म्हणूनच 10 नोव्हेंबरला निकाल लागल्यावर चिराग यांना "हातचा' म्हणून भाजप नेतृत्वाने कुशलतेने बाजूला ठेवले आहे. 
 
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com