मोदी सरकारच्या नियोजनाचा फज्जा; गुजरातनंतर मध्य प्रदेश, कर्नाटकचीही माघार

लशींच्या पुरेशा साठ्याअभावी देशात अनेक राज्यांत लसीकरणाचा तिसरा टप्पा उद्यापासून सुरू होण्याची शक्यता कमी आहे.
wont be possible to start vaccination for those above 18 yrs on May 1
wont be possible to start vaccination for those above 18 yrs on May 1

नवी दिल्ली : देशात कोरोनाचा कहर वाढत असल्याने वेगात लसीकरण करण्यासाठी मोदी सरकारकडून प्रयत्न केले जात आहेत. या उद्देशाने देशात एक मे पासून लसीकरणाचा तिसरा टप्पा सुरू होणार आहे. याअंतर्गत 18 ते 44 वयोगटातील नागरिकांना लस दिली जाणार आहे. पण राज्यांना लस पुरविण्याबाबत कसलेच नियोजन नसल्याचे उघडकीस आले आहे. बहुतेक राज्यांकडे पुरेसा साठा नसल्याने नियोजनाचा फज्जा उडाला असून अनेक राज्यांत एक मेपासून तिसरा टप्पा सुरू होणार नाही, हे स्पष्ट झाले आहे.

केंद्रीय आरोग्यमंत्री डॅा. हर्षवर्धन यांनी राज्यांना लशींचा पुरेसा पुरवठा केला जात असल्याचा दावा केला आहे. पण महाराष्ट्रासह अनेक राज्यांनी लशींचा पुरेसा साठा नसल्याने तिसरा टप्पा सुरू करता येणार नाही असे म्हटले आहे. डॅा. हर्षवर्धन यांचा दावा भाजपच्या राज्यांनीच खोडून काढला आहे. गुजरातसह हिमाचल प्रदेश, हरयाणाच्या सरकारांनी आपल्याकडे लसीकरणाच्या तिसऱ्या टप्प्यासाठी पुरेसा साठा नसल्याचे म्हटले आहे. आता त्यात मध्य प्रदेश आणि कर्नाटक या भाजपची सत्ता असलेल्या मोठ्या राज्यांचीही भर पडली आहे.

भाजपच्या राज्यांनीच लशींचा तुटवडा असल्याचे उघडपणे मान्य केल्याने मोदी सरकारला घरचा आहेर मिळाला आहे. लसीकरणावरून महाराष्ट्रावर सातत्याने भाजपच्या नेत्यांकडून टीका केली जाते. पण आता भाजपच्या राज्यांकडूनच लसीकरणाच्या तुटवड्याबाबत स्पष्टीकरण देण्यात आले आहे.

मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान म्हणाले, कोविशिल्ड व कोव्हॅक्सीन लस खरेदीची अॅार्डर दिली आहे. पण दोन्ही लस उत्पादकांनी एक पर्यंत लस पुरवठा करण्यास असमर्थता दर्शविली आहे. त्यामुळे एक मेपासून तिसरा टप्पा सुरू करणे शक्य होणार नाही. 

कर्नाटकचे आरोग्य मंत्री के. सुधाकर यांनीही हात वर केले आहेत. ते म्हणाले, सिरम इन्स्टिट्युटला जवळपास एक कोटी लशींची अॅार्डर दिली आहे. पण उद्यापासून लस देण्यास ते तयार नाहीत. आम्ही 18 ते 44 वयोगटातील नागरिकांना लशीसाठी रुग्णालयात न येण्याचे आवाहन केले आहे. 

दरम्यान, गुजरात सरकारने म्हटलं आहे की, 18 ते 44 वयोगटातील नागरिकांना लसीकरण सुरू करायचे आहे. पण कंपन्यांकडून लशीचे पुरसे डोस मिळाल्यानंतरही हे सुरू केले जाईल. तर हिमाचल प्रदेश सरकारनेही लशींचा अॅार्डर दिल्याचे सांगत सरकारी लसीकरण केंद्रात ही अॅार्डर मिळाल्यानंतरच संबंधितांना लस दिली जाईल, असे स्पष्ट केले आहे. 

हरयाणा वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, हरयाणामध्ये लशींचा तुटवडा आहे. पण ही परिस्थिती फक्त हरयाणामध्ये नसून संपूर्ण देशातच आहे. त्यामुळे राज्याला अपेक्षेप्रमाणे लस मिळत नाही. त्यामुळे लसीकरणावर परिणाम झाला आहे. 1 मेपासून सुरू होणाऱ्या लसीकरणासाठी आम्ही अॅार्डर दिली आहे. 

चोवीस तासात साडे तीन हजार मृत्यू

देशात मागील चोवीस तासांत 3 हजार 498 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. तर 3 लाख 86 हजार 452 नवीन रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे देशातील एकूण कोरोनाबाधित रुग्णांचा आकडा सुमारे 1 कोटी 87 लाखांवर पोहचला आहे. तर दोन लाखांहून अधिक मृत्यू झाले असून सध्या सुमारे 31 लाख 70 हजार सक्रीय रुग्ण आहेत.

Edited By Rajanand More

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com