पोलिस महासंचालकांनी गाडीत बसवून लैंगिक छळ केला : IPS महिलेची तक्रार

महासंचालकांचीबदली करण्यात आली असून चौकशीसाठी सहा सदस्यांची समिती स्थापन केली आहे.
Women ips officer accuses DGP of sexual harrasing her
Women ips officer accuses DGP of sexual harrasing her

चेन्नई : विशेष पोलिस महासंचालकांनी एका महिला आयपीएस अधिकाऱ्याचा लैंगिक छळ केल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी संबंधित अधिकाऱ्यांनी तक्रार केल्यानंतर महासंचालकांची बदली करण्यात आली असून चौकशीसाठी सहा सदस्यांची समिती स्थापन करण्यात आली आहे. 

तामिळनाडूचे विशेष पोलिस महासंचालक (कायदा व सुव्यवस्था) राजेश दास यांच्याविरुध्द तक्रार करण्यात आली आहे. तक्रार करण्यात आलेल्या महिला आयपीएस अधिकाऱ्याची मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्यावेळी सुरक्षा व्यवस्थेची जबाबदारी होती. ही महिला अधिकारी संबंधित जिल्ह्याची पोलिस अधिक्षक आहे. या दौऱ्यादरम्यान त्या दास यांच्या कारमधून प्रवास करत होत्या. या कारमध्येच दास यांनी आपला लैंगिक छळ केल्याचा आरोप महिला अधिकाऱ्याने केला आहे. 

या प्रकारानंतर महिला अधिकाऱ्याने दास यांची तक्रार राज्याचे पोलिस महासंचालक जे. के. त्रिपाठी आणि गृह सचिवांकडे केली. त्यानंतर विरोधी पक्षांनीही संबंधित महिला अधिकाऱ्याची बाजू घेत कारवाईची मागणी केली. डीएमकेच्या खासदार कनिमोळी यांनीही सरकारने कारवाई न केल्यास आंदोलन करण्याचा इशारा दिला होता.

डीमकेचे प्रमुख स्टॅलिन यांनीही कारवाईची मागणी केली होती. दास यांना मुख्यमंत्री पाठिशी घालत असल्याचा आरोप त्यांनी केला होता. त्यानंतर राज्य सरकारने तातडीने समिती नेमून चौकशीचे आदेश  दिले आहेत. तसेच दास यांची बदलीही केली आहे. 

गृह विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव एस. के. प्रभाकर यांनी बुधवारी दास यांच्या चौकशीचा आदेश काढला. चौकशीसाठी सहा सदस्यांची समिती स्थापन करण्यात आली आहे. वरिष्ठ आयएएस अधिकारी जयश्री रघुनंदन समितीच्या अध्यक्ष आहेत. चौकशी पूर्ण होईपर्यंत दास यांची बदली करून नियुक्तीच्या प्रतिक्षा यादीत टाकण्यात आले आहे. तसेच त्यांचा विशेष डीजीपीचा दर्जाही काढून घेण्यात आला आहे. 

दरम्यान, तमिळनाडूमध्ये एखाद्या आयपीएस अधिकाऱ्याविरुध्द पहिल्यांदाच अशी तक्रार झालेली नाही. यापूर्वीही अॉगस्ट 2018 मध्ये एका महिला पोलिस अधिक्षकांनी सतर्कता आणि भ्रष्टाचार विरोधी संचालनालयाचे तत्कालीन सह संचालक एस. मुरूगन यांच्यावर लैंगिक छळाचा आरोप केला होता. त्यावेळीही एका महिला आयपीएस अधिकाऱ्याच्या नेतृत्वाखाली समिती नेमण्यात आली होती. त्यानंतर पीडित महिला अधिकारी उच्च न्यायालयापर्यंत गेली होती. 

Edited By Rajanand More

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com