भाजप आमदार माझी हत्या करतील! सेक्स स्कँडलमधील तरुणीची उच्च न्यायालयात धाव - Woman writes to Karnataka high court reiterates threat from bjp mla | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

पंतप्रधान नरेंद्र मोदी शनिवारी सकाळी ८.३० वाजता आषाढी पौर्णिमा- धम्म चक्र दिवशी देशवासियांशी संबोधित करतील . मोदी यांनी ट्विटद्वारे याबाबत माहिती दिली आहे.
चिपळूणमध्ये : पुराचे पाणी अपरांत हाँस्पिटलमध्ये शिरले त्यामुळे वीज पुरवठा बंद झाल्यामुळे व्हेंटिलेटरवरील ८ रुग्ण दगावले.

भाजप आमदार माझी हत्या करतील! सेक्स स्कँडलमधील तरुणीची उच्च न्यायालयात धाव

वृत्तसंस्था
सोमवार, 29 मार्च 2021

अश्लील व्हिडिओप्रकरणात अडकलेले भाजपचे आमदार रमेश जारकीहोळी आणखी अडचणी येण्याची शक्यता आहे.

बेंगलुरू : अश्लील व्हिडिओप्रकरणात अडकलेले भाजपचे आमदार रमेश जारकीहोळी आणखी अडचणी येण्याची शक्यता आहे. या प्रकरणातील तरुणीने जारकीहोळी यांच्याकडून आपल्या जीवाला धोका आहे. त्यामुळे आपल्याला संरक्षण मिळावे, अशी मागणी उच्च न्यायालयाकडे केली आहे. जारकीहोळी यांनी आपल्यासह कुटूंबाला धमकावल्याचा आरोप या तरूणीने केला आहे. 

जारकीहोळी यांच्या प्रकरणामुळे कर्नाटकमधील भाजपच्या बी. एस. येडियुरप्पा सरकारसमोर नवे संकट निर्माण झाले आहे. विरोधकांकडून सरकारवर जोरदार टीका केली जात आहे. त्यातच तरूणी काही दिवसांपूर्वी एक व्हिडिओ जारी केला होता. ''ते मला व माझ्या कुटुंबाला ठार मारू शकतात. मी जारकीहोळी यांच्याकडून सुरू असलेल्या छळामुळे त्यांच्या नावाने चिठ्ठी लिहून आत्महत्या करणार आहे'', असे तिने या व्हिडिओमध्ये म्हटले आहे.

हेही वाचा : शरद पवार शस्त्रक्रियेसाठी बुधवारी ब्रीच कँडीमध्ये दाखल होणार

त्यानंतर या तरूणीने आता कर्नाटक उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. जारकीहोळी माझी कुठेही हत्या करू शकतात. तसेच या प्रकरणातील ते प्रत्येक पुरावाही ते नष्ट करतील. प्रकरणाच्या चौकशीसाठी स्थापन केलेली एसआयटीही त्यांच्या इशाऱ्यावर नाचत आहे. माझ्या कुटूंबावरही दबाव टाकला जात आहे. त्यामुळे न्यायालयाने या प्रकरणाची सुनावणी घेऊन राज्य सरकारला मला संरक्षण देण्याचे आदेश द्यावेत, अशी मागणी तरूणीने केली आहे. तरूणीच्या या मागणीमुळे जारकीहोळी आणखी अडचणी येण्याची शक्यता आहे. 

हेही वाचा : केजरीवाल सरकारला धक्का; केंद्राच्या दिल्ली विधेयकाचे कायद्यात रुपांतर

व्हिडिओत काय म्हणाली तरूणी?

मी आणि माझ्या कुटुंबीयांत झालेल्या संभाषणाची सीडी 2 मार्चला जाहीर करण्यात आली. याचा मला धक्का बसला आहे. काय करावे हेच मला कळत नाही. कुठे जावे हे मला सुचत नाही. मी माझ्या ओळखीच्या एका प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधीशी संपर्क साधला. परंतु, त्याने काहीही करण्यास नकार दिला. त्याने मला काँग्रेसमधील सिद्धरामय्या आणि डी.के.शिवकुमार यांच्यासारख्या नेत्यांची मदत घेण्याचा सल्ला दिला. यानंतर मी शिवकुमार यांच्या निवासस्थानी गेले परंतु, ते घरी नव्हते. माझ्या कुटुंबीयांनी पोलिसांनी बंगळूरमध्ये आणून त्यांना सरंक्षण द्यावे, असे त्या तरुणीने म्हटले आहे. 

जारकीहोळी यांनी एका तरुणीसोबत केलेले अश्लील चाळ्यांचा व्हिडीओ समोर आला आहे. जारकीहोळी यांनी धमकावून लैंगिक छळ केल्याचा आरोप या तरुणीने केला आहे. हे प्रकरण समोर आल्यानंतर कर्नाटकमध्ये खळबळ उडाली आहे. कर्नाटकातील राजकारणामध्ये अशी सेक्स स्कँडल नवीन नाहीत. यापूर्वीही अशी अनेक प्रकरणे समोर आली आहेत. 

Edited By Rajanand More

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख