काँग्रेस आमदाराच्या बंगल्यातच मैत्रिणीची आत्महत्या

आत्महत्या करण्यापूर्वी तिने चिठ्ठी लिहून ठेवली आहे. 'आता सहन करू शकत नाही' असं या चिठ्ठीत लिहिलं आहे.
A woman allegedly died by suicide at the residence of Congress MLA Umang Singhar
A woman allegedly died by suicide at the residence of Congress MLA Umang Singhar

भोपाळ : मागील काही दिवसांपासून काँग्रेस आमदाराच्या बंगल्यात राहणाऱ्या त्यांच्या मैत्रिणीने तिथेच गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे समोर आले आहे. आत्महत्या करण्यापूर्वी तिने चिठ्ठी लिहून ठेवली आहे. 'आता सहन करू शकत नाही' असं या चिठ्ठीत लिहिलं आहे. त्यामुळं काँग्रेस आमदारासमोरील अडचणी वाढल्या आहेत. (A woman allegedly died by suicide at the residence of Congress MLA Umang Singhar)

मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री कमलनाथ यांच्या सरकारमध्ये आमदार उमंग सिंघार (Umang Singhar) वनमंत्री होते. त्यांच्या बंगल्यात ही घटना घडली आहे. सोनिया भारव्दाज (Sonia Bhardwaj) असं या 39 वर्षीय महिलेचं नाव आहे. ही घटना घडली त्यावेळी सिंघार हे आपल्या मतदारसंघात गेले होते. ही महिला मागील काही दिवसांपासून त्यांच्या शाहपुरा येथील खासगी बंगल्यात राहत असल्याची माहिती समोर आली आहे. ही महिला मुळची अंबाला येथील बलदेव नगरमध्ये राहणारी आहे. 

मिळालेल्या माहितीनुसार, सिंघार व सोनिया यांच्यामध्ये चांगली मैत्री होती. त्यामुळं त्या अनेकदा यापूर्वीही या बंगल्यात राहिल्या आहेत. घटना घडली त्यावेळी बंगल्यात नोकर व त्याची पत्नी होती. रविवारी सकाळी 11 वाजेपर्यंत सोनिया यांच्या खोलीचा दरवाजा उघडला नाही. त्यामुळे नोकराच्या पत्नीने अनेकदा दरवाजा वाजवला. पण प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळं नोकरीने सिंघार यांना याबाबत कळविले. त्यांनी एकाला तिथे पाठविले तेव्हा सोनिया यांनी गळफास घेतल्याचे समोर आलं.

माझी चांगली मैत्रीण 

सोनिया भारव्दाज यांच्या आत्महत्येनंतर आमदार सिंघार भोपाळमध्ये दाखल झाले आहेत. सिंघार म्हणाले, 'सोनिया माझी खूप चांगली मैत्रीण होती. तिने आत्महत्येचे पाऊल का उचलले? मलाही काही माहित नाही.' दरम्यान, सोनिया व सिंघार यांची दिल्लीत ओळख झाल्याचे बोलले जात आहे. सोनिया यांनी पहिल्या पतीला सोडून देत दुसरे लग्न केलं होतं. पण त्यांचं दुसरं लग्नही टिकलं नाही. त्यांना 18 वर्षांचा मुलगाही आहे. 

आता मी सहन करू शकत नाही

सोनिया यांनी आत्महत्या करण्यापुर्वी लिहिलेली चिठ्ठी पोलिसांना सापडली आहे. 'तुम गुस्से में बहुत तेज हो, अब सहन नहीं कर सकती' असं चिठ्ठीत लिहिलं आहे. त्यामध्ये सिंघार यांच्या नावाचाही उल्लेख असल्याचे समजते. पण सोनिया यांनी आत्महत्येसाठी कुणालाही जबाबदार धरलेले नाही. त्यामुळे सोनिया यांच्या कुटूंबियांच्या जबाबावरच हे प्रकरण अवलंबून असल्याचं पोलिसांचं म्हणणं आहे. अतिरिक्त पोलिस अधिक्षक राजेश सिंग भदौरिया यांनी सांगितलं की, आज शवविच्छेदन करण्यात आलं असून अहवालाची प्रतिक्षा आहे. तिची आई व मुलाचा जबाब घेतला आहे. आता पुढील तपास सुरू आहे. 

Edited By Rajanand More


 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com