नवे कृषी कायदे मागे घ्या, अन्यथा एनडीतून बाहेर पडू, अमित शहांना यांनी दिला इशारा !  - Withdraw new agricultural laws, otherwise we will quit ND, Amit Shah warned! | Politics Marathi News - Sarkarnama

नवे कृषी कायदे मागे घ्या, अन्यथा एनडीतून बाहेर पडू, अमित शहांना यांनी दिला इशारा ! 

वृत्तसंस्था
सोमवार, 30 नोव्हेंबर 2020

मोदी सरकारने ही कृषी कायदे मागे घ्यावेत अशी मागणी शेतकरी करीत आहेत.

नवी दिल्ली : राष्ट्रीय लोकतांत्रिक पक्षाचे (आरएलपी) संयोजक आणि खासदार बेनीवाल यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना पत्र लिहून मोदी सरकारने आणलेले कृषी कायदे मागे घेण्याची मागणी केली आहे. जर ही मागणी मान्य झाली नाही तर आपण एनडीएतून बाहेर पडू असा इशारा त्यांनी शहा यांना दिला आहे. 

मोदी सरकारने अलिकडेच तीन कृषी कायदे आणले आहेत. या कायद्याविरोधात देशातील शेतकऱ्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. पंजाब, हरियाणा, यूपी, बिहार तसेच महाराष्ट्रातील शेतकरीही विरोध करीत आहेत. गेल्या काही दिवसापासून दिल्लीत शेतकऱ्यांनी आंदोलन सुरू केले आहे. या आंदोलनाचा केंद्रातील मोदी सरकारने धसका घेतला आहे. हे आंदोलन मिटविण्यासाठी भाजपचे वरिष्ठ नेते कालपासून बैठकावर बैठका घेत आहेत. 

काल भाजपचे अध्यक्ष जे. पी. नड्डा यांच्या निवासस्थानी झालेल्या बैठकीला संरक्षण मंत्री राजनाथसिंह, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, केंद्रीय कृषी मंत्री तोमर आदी उपस्थित होते. शेतकऱ्यांशी सरकार बोलणी करीत आहे मात्र अद्याप कोणताही मार्ग निघाला नाही.

मोदी सरकारने ही कृषी कायदे मागे घ्यावेत अशी मागणी शेतकरी करीत आहेत. नव्य कृषी कायद्याने शेतकरी उद्वस्त होईल अशी भिती व्यक्त केली जात आहे.तर मोदी यांनी या नव्या कृषी कायद्याने शेतकऱ्यांचे कसे हित होणार आहे हे स्पष्ट केले आहे. त्यांनी विरोधकांवरही टीका केली आहे. 

एकीकडे मोदी सरकार कृषी कायद्याचे समर्थन करीत असताना दुसरीकडे एनडीएचा घटक पक्ष असलेल्या आरएलपीने मात्र कृषी कायदे मागे घेण्याची मागणी केली आहे. आरएलपीचे नेते आणि राजस्थानातील नागौर लोकसभा मतदारसंघाचे खासदार हनुमान बेनीवाल यांनी गृहमंत्री अमित शहा यांना थेट इशारा दिला आहे. 

त्यांनी म्हटले आहे, की अमित शहाजी देशात शेतकऱ्यांचे जे आंदोलन सुरू आहे. त्याची दखल सरकारने घेतली पाहिजे. जे तीन नवे कायदे आणले आहेत ते मागे घ्यावेत. ीतसेच संपूर्ण स्वामिनाथन आयोगाची अंमलबजावणी करण्यात यावी. दिल्लीत आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांशी चर्चा करून मार्ग काढावा. मात्र कृषी कायदे मागे घेण्यात यावेत अशी मागणी आहे.

जर तिन्हे विधेयक मागे घेतले नाहीत तर आपण एनडीएतून बाहेर पडू असा इशारा बेनीवाल यांनी अमित शहा यांना पत्र लिहून दिला आहे. तसेच त्यांनी याबाबत ट्‌विटही केले आहे. 
 
 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख