बंगालमध्ये 'एनआरसी' कधीच लागू होऊ देणार नाही... - Will never let NPR, NRC be implemented in West Bengal: Mamata Banerjee | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

राजीव सातव यांच्या पार्थिवावर सोमवारी (ता. 17 मे) रोजी सकाळी दहा वाजता कळमनुरी (जि. हिंगोली) येथे अंत्यसंस्कार होणार.
राजीव सातव यांचे कोरोनाने निधन

बंगालमध्ये 'एनआरसी' कधीच लागू होऊ देणार नाही...

सरकारनामा ब्यूरो
बुधवार, 24 मार्च 2021

तुमचे नाव पश्चिम बंगालच्या नागरिकत्वामधून उडण्याची शक्यता आहे.बंगालमध्ये वादग्रस्त एनपीआर आणि एनआरसी कधीच लागू होऊ देणार नाही, अशी माहिती पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी बुधवारी दिली. 

पश्चिम बंगाल: विधानसभा निवडणुकीच्या तारखा जशाजशा जवळ येऊ लागल्या आहेत, तशातशा राजकारण्यांच्या एकमेकांवरील आरोप-प्रत्यारोपांच्या फेऱ्या वाढल्याचे दिसते. २७ मार्चपासून पश्चिम बंगालमध्ये ८ टप्प्यात विधानसभा निवडणुका होणार असून भाजप व तृणमूल काँग्रेस यांच्यात सत्तेसाठी रस्सीखेच सुरू होणार आहे. याच पार्श्वभूमीवर पश्चिम बंगालमध्ये मोठ-मोठ्या घोषणा करण्याचे पेव फुटल्याचे दिसते. बंगालमध्ये वादग्रस्त एनपीआर आणि एनआरसी कधीच लागू होऊ देणार नाही, अशी माहिती पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी बुधवारी दिली. 

बांकुरा येथील रॅलीत त्यांनी हे विधान केले. ममता बॅनर्जी म्हणाल्या, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आसाममधील १४ लाख बंगाली नागरिकांची नावे वगळली असून तुमचे नावही पश्चिम बंगालच्या नागरिकत्वामधून उडण्याची शक्यता आहे. परंतु, मी सत्तेत असेपर्यंत तसे होऊ देणार नसून एनपीआर, एनआरसी कदापि लागू होऊ देणार नाही, असेही त्या म्हणाल्या. 

प्रसिद्ध उद्योजक गौतम अदानी यांच्या नावाचा उल्लेख करत पंतप्रधान नरेंद्र मोदी व अदानी एकमेकांचे बंधू असून दोघांनीही शेतकऱ्यांच्या जमिनी हडपल्या आहेत. मागील विधानसभा निवडणुकीत तुम्ही भाजपला मतदान केल्याने मला अतीव दुःख झाले. भाजप बाहेरील गुंडांना बोलावून बंगालवर कब्जा मिळवण्याच्या बेतात आहे. त्यांनी माझ्या पायाला इजा केली, जेणेकरून मी तुमच्यापर्यंत पोहोचू नये. मात्र मी घाबरणारी व्यक्ती नसून बंदुकीच्या गोळ्यांशी मी सहज लढू शकते, असेही त्या म्हणाल्या. विधानसभा निवडणुकीपूर्वी भाजपने रस्त्यांवर प्रचार करत रस्ते व्यापल्यास बंगालमधील माता-भगिनी त्यांना घरातील भांडी व झाडूने परतावून लावतील, असा इशाराही ममता यांनी दिला.    

      

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख