ज्यांचा जावई लोकांच्या जमीनी खातो,ती कॉंग्रेस शेतकऱ्यांचे काय भले करणार ? इराणींचा हल्लाबोल - Whose son-in-law eats people's land, what good will Congress do to the farmers? Attack of the Iranians | Politics Marathi News - Sarkarnama

ज्यांचा जावई लोकांच्या जमीनी खातो,ती कॉंग्रेस शेतकऱ्यांचे काय भले करणार ? इराणींचा हल्लाबोल

वृत्तसंस्था
शनिवार, 24 ऑक्टोबर 2020

स्मृती इराणी या कॉंग्रेसच्या कट्टर विरोधक आहेत.

 बडोदा : ज्यांचा जावई शेतकऱ्यांची जमीनी खातो, ती कॉंग्रेस शेतकऱ्याच्या जमीनी काय वाचविणार आहेत का ? असा सवाल केंद्रीय मंत्री आणि भाजपच्या नेत्या स्मृती इराणी यांनी केला आहे. 

गुजरातमधील विधानसभेच्या पोटनिवडणूक प्रचारासाठी स्मृती इराणी गुजरातच्या दौऱ्यावर आहेत. यावेळी त्यांनी कॉंग्रेसवर कडाडून हल्ला चढविला.

त्या म्हणाल्या, की भैय्या, ज्यांच्या जावयांने दुसऱ्यांच्या जमीनी खाल्या, ते तुमच्या जमीनी काय वाचविणार आहे. कॉंग्रेसने वर्षानुवर्षे देशाला लुटले आहे. त्यांचे हेच राजकारण राहिले आहे. देशाची तिजोरी यांनी लुटली आहे. त्यामुळे कॉंग्रेसला पुन्हा एकदा धडा शिकवा. 

येत्या तीन तारखेला मतदानाच्या बूथवर या आणि कमळाचे बटन दाबा आणि भाजपच्या उमेदवाराला विजयी करा असे आवाहनही त्यांनी यावेळी केले. 

स्मृती इराणी या कॉंग्रेसच्या कट्टर विरोधक आहेत. त्यांनी राहुल गांधीचा 2019 च्या निवडणुकीत पराभव केला होता. संसद असो की कोणतेही निवडणुकीचे मैदान त्या नेहमीच कॉंग्रेसवर तुटून पडतात.

गुजरातच्या दौऱ्यावर असलेल्या स्मृती इराणी यांनी कॉंग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांचे भावजी रॉबर्ट वद्रा यांचे नाव घेता टीका केली आहे. वद्रा यांच्यावर हरियाणातील जमीनप्रकरणी गैरव्यवहार केल्याचा आरोप आहे. याच मुद्दयावरून भाजप कॉंग्रेसवर टीका करीत असते. वद्रा यांनी सीबीआय आणि ईडीने चौकशी केली होती. 

स्मृती इराणी यांनी हाच धागा पकडून कॉंग्रेसवर हल्लाबोल केला आहे. राहुल गांधी हे कृषि कायद्यावरून मोदी सरकारवर आरोप करीत आहेत. पंजाबमध्येही त्यांनी ट्रॅक्‍टर रॅलीत सहभागी होऊन मोदींना लक्ष्य केले होते.मोदींना लक्ष्य करणाऱ्या राहुल गांधींवर स्मृती इराणीही जोरदार टीकास्त्र सोडत आहेत. 

हे ही वाचा : 

मोदींच्या 'हनुमाना'चा भव्य सीता मंदिराच्या निर्माणासाठी पुढाकार
 
नवी दिल्ली : बिहारमध्ये प्रचाराला आता जोर चढला असून, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी थेट प्रचारात उडी घेतली आहे. मोदींना जाहीर सभेत बोलताना दिवंगत सहकारी रामविलास पासवान  यांच्या आठवणी जागवून जनभावनेला हात घातला होता.

 यानंतर पासवान यांचे पुत्र चिराग यांनी मोदींचे जाहीर आभार मानले होते. आता स्वत:ला मोदींचा हनुमान म्हणवून घेणारे चिराग हे सीतामढीला भेट देणार आहेत. तेथे भव्य मंदिराचे निर्माण करण्याचा प्रस्ताव ते मांडतील, अशी माहिती सूत्रांनी दिली. 

मुख्यमंत्री नितीशकुमार यांना विरोध करीत बिहारमधील सत्ताधारी राष्ट्रीय लोकशाही आघाडीतून (एनडीए) लोक जनशक्ती पक्ष (एलजेपी) बाहेर पडला आहे. याचवेळी देश पातळीवर भाजपला पाठिंबा कायम राहील, अशी भूमिका एलजेपीचे अध्यक्ष चिराग पासवान यांनी घेतली आहे. चिराग यांनी हे नितीशकुमार यांना लक्ष्य करीत आहेत. तरुणांच्या हाती सूत्रे मिळावीत अशी भूमिका घेतली त्यांनी आहे. 

चिराग पासवान हे स्वत:ला मोदींचा हनुमान म्हणवून घेत आहेत. ते 25 ऑक्टोबरला सीतामढीला भेट देणार आहेत. सीतेची जन्मभूमी असलेल्या सीतामढीत सीतेचे भव्य मंदिर उभारण्याचे आश्वासन चिराग यांनी दिले आहे.
 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख