आपण नक्की जिंकणार, ट्रम्पतात्यांना विश्वास  - The whole world is targeting America, Trump or Biden! | Politics Marathi News - Sarkarnama

आपण नक्की जिंकणार, ट्रम्पतात्यांना विश्वास 

वृत्तसंस्था
बुधवार, 4 नोव्हेंबर 2020

ट्रम्प यांनी निवडणुकीत घोटाळा झाल्याचाही आरोप केला आहे.

वॉशिंग्टन : अमेरिकेच्या अध्यक्षपदासाठी मतमोजणी सुरू असून दोघांमध्ये कॉंटे की टक्कर सुरू असल्याचे दिसते. अमेरिकेचे अध्यक्ष रिपब्लिकन पक्षाचे उमेदवार संपूर्ण जगाचे अमेरिकेकडे लक्ष्य, ट्रम्प की बायडन ! 

अमेरिकन निवडणुकीचे निकाल म्हणजे विलंब हे आलेत. भारतासारखी अमेरिकेची निवडणूक प्रक्रिया सोपी आणि सरळ नाही. आतापर्यंत ट्रम्प हे आपण सहज जिंकू असा दावा करीत होते मात्र तसे काही चित्र दिसत नाही. उलट डेमोक्रडीक पक्षाचे उमेदवार बायडन यांनी त्यांना घाम फोडला आहे.मतमोजणी सुरू असताना ट्रम्प आपल्या भाषणात म्हणाले, की आमचा पक्ष पुन्हा जिंकत आहे. लोक उत्साहाने घराबाहेर पडत आहे. विजयाचा आनंद त्यांना झालेला आहे. मात्र यावेळी निवडणुकीत काही तरी गडबड झाल्याचा दावाही त्यांनी केला. 

मी सर्वोच्च न्यायालयात जाणार असून जे मतदान सुरू आहे ते थांबविण्यात यावे अशी माझी मागणी आहे.

मुळात आम्ही जिंकलो असतानाही मतमोजणी का सुरू ठेवली आहे असा दावाही त्यांनी यावेळी केला. मी अमेरिकन नागरिकांचे मनापासून आभार मानतो. त्यांनी मला भक्कम पाठिंबा दिला. तसेच संध्याकाळपर्यंत चित्र स्पष्ट होईल असेही ट्रम्प यांनी म्हटले आहे. 

फ्लोरिडामध्ये आम्ही जिंकलो आहोत. माझा विजय झाला हे काही वेळात स्पष्ट होईल असेही ट्रम्प यांनी म्हटले आहे. 

ट्रम्प यांनी निवडणुकीत घोटाळा झाल्याचाही आरोप केला आहे. पुढील मतदान थांबवण्यासाठी सर्वोच्च न्यायालयात जाणार असल्याचे ट्रम्प यांनी म्हटले आहे. “ट्रम्प यांनी  बायडेन आणि डेमोक्रॅटसवर निवडणुकीत घोटाळा केल्याचा आरोप केला आहे. आपण या विरोधात सर्वोच्च न्यायालयात जाणार असल्याचे ट्रम्प यांनी म्हटले आहे. 

“आपण दुसऱ्या अन्य राज्यात जिंकतोय हे जाहीर करणार होतो आणि तितक्या हा घोटाळा झाला. ही अमेरिकन लोकांची फसवणूक आहे आणि आम्ही ही फसवणूक होऊ देणार नाही” असे ट्रम्प म्हणाले.

“निकाल अभूतपूर्व आहे. आपण नक्कीच जिंकणार आहोत. आपण राज्यांमध्ये खूपच पुढे आहोत. तिथून आकडे येत आहेत. ते आपली बरोबर करु शकत नाहीत” असे ट्रम्प म्हणाले.
 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख