'डब्ल्यूएचओ'लाही पंतप्रधान मोदींचे कौतुक!

एकत्रित लढा उभारूनच आपण विषाणुला रोखून लोकांचे जीव वाचवू शकू, असेही संघटनेने म्हटले आहे.
WHO praises India And PM Narendra Modi
WHO praises India And PM Narendra Modi

नवी दिल्ली : कोरोनाच्या लढाईमध्ये सातत्याने सहकार्य केल्याबद्दल जागतिक आरोग्य संघटनेने (डब्ल्यूएचओ) पंतप्रधान नरेंद्र मोदी व भारताचे कौतुक करून आभार मानले आहेत. एकत्रित लढा उभारूनच आपण विषाणुला रोखून लोकांचे जीव वाचवू शकू, असेही संघटनेने म्हटले आहे. 

अमेरिकेनंतर भारतातच कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण आहेत. भारतात कोरोनाचा शिरकाव झाल्यानंतर आरोग्य संघटनेने चिंता व्यक्त केली होती. भारतासारख्या लोकसंख्येची घनता अधिक असलेल्या देशामध्ये कोरोनाचा संसर्ग अधिक वेगाने वाढत जाईल. रुग्णांचा आकडा भयानक असेल, अशी भिती व्यक्त करण्यात आली होती. मात्र, देशातील काही मोजकी राज्य वगळता कोरोनाचा संसर्ग अधिक प्रमाणात वाढला नाही. सध्या देशात एक कोटींहून अधिक रुग्णसंख्या आहे. मागील काही दिवसांपासून कोरोनाच्या रुग्णांमध्ये घट होत चालली आहे.

भारतात कोरोनाची स्थिती सुधारत असल्याने जागतिक स्तरावरून भारताचे कौतुक होत आहे. अमेरिकेनेही भारताच्या प्रयत्नांची प्रशंसा केली आहे. आरोग्य संघटनेचे महासंचालक टेड्रॉस अधानोम घेब्रेयसस यांनी ट्विट करून भारताचे आभार मानले आहेत. 

दरम्यान, भारतातून सौदी अरब, दक्षिण आफ्रिका, ब्राझील, मोरोक्को, बांग्लादेश या देशांना कोरोना लस पाठविली जाणार आहे. आतापयर्यंत मालदीव, भुतान, नेपाळ, बांग्लादेश, सेशेल्स व म्यांमा यांना मदत म्हणून लस पाठविण्यात आली आहे. बुधवारी कोविशिल्ड लसीचे भुतानला दीड लाख व मालदीवला एक लाख डोस पाठविले.

गुरूवारी 20 लाख डोस बांग्लादेशला आणि 10 लाख डोस नेपाळला पाठविण्यात आले. तसेच शुक्रवारी 15 लाख डोस म्यांमा आणि 50 हजार डोस सेशेल्सला देण्यात पाठविण्यात आल्याची माहिती विदेश मंत्रालयाचे प्रवक्त अनुराग श्रीवास्तव यांनी दिली. पुढील काळातही भारताकडून टप्प्याटप्प्याने भारताच्या मित्र देशांना लस पाठविण्यात येईल, असे त्यांनी स्पष्ट केले.

पाकिस्तानला लस पाठविण्याबाबत विचारलेल्या प्रश्नावर बोलताना श्रीवास्तव यांनी 'पाकिस्तानकडून सरकारकडे किंवा व्यापाराच्या माध्यमातून लस पाठविण्याचा मागणीसंदर्भात माहिती नाही,' असे उत्तर दिले.

Edited By Rajanand More

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com